गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याचा मानस १५ जून २०२५ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याचा मानस
१५ जून २०२५ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन

विरार – संदीप शेमणकर
विरार/नालासोपारा – समाज संघटन, युवक प्रबोधन आणि सांस्कृतिक जपणूक यासाठी कार्यरत असलेल्या गवळी समाज संघटनेचा तिसरा वर्धापन दिन दिनांक १५ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही संघटना सामाजिक सलोखा, युवा सशक्तीकरण आणि स्त्री-पुरुष समत्वासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सखुबाई भास्कर हॉल,मनवेल पाडा गाव, विरार (पूर्व) येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी २ वाजता सत्यनारायण पूजनाने होणार आहे. धार्मिकतेच्या वातावरणानंतर मुलांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा, तसेच गायन व नृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, जे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे.
कार्यक्रमाचा एक विशेष भाग म्हणजे समाजातील १०वी, १२वी व पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा, जिथे गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांचे मनोबल वाढवले जाणार आहे. या कार्यक्रमात समाजातील विविध गुणी वक्ते आणि मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
महिलांसाठी खास उपक्रम जसे की हळदी कुंकू, संगीत खुर्ची, नशिबाचा कौल व प्रश्नमंजुषा यांचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. महिलांच्या सहभागातून समाजातील एकात्मता आणि संवाद वाढवण्याचा उद्देश आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर भूषवणार आहेत. यावेळी विभागाचे आमदार राजन नाईक, युवा नेते व माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी स्थायी सभापती प्रशांत राऊत, तसेच इतर समाजप्रेमी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या भव्य सोहळ्याला गवळी समाज संघटनेच्या सर्व कार्यकारिणी मंडळातर्फे समाजातील सर्व बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सामाजिक ऐक्याचा, नव्या पिढीला प्रेरणा देणारा आणि एकतेचा साक्षीदार ठरणार आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात