दळे ग्रामपंचायतीच्या बेकायदा सभेचा अहवाल आठ महिन्यांनी सादर; होळी ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दळेतील त्या नियमबाह्य ग्रामसभेचा अहवाल तब्बल आठ महिन्याने सी. ई. ओ. कडे सादर…

बी.डी.ओ. निलेश जगताप यांचा कारनामा

आत्ता सी. ई. ओ. च्या भूमीकेकडे लक्ष,अन्यथा होळी ग्रामस्थांचा १५ ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर:-( दळे) :- राजापूर तालुक्यातील मनमानी कारभार ने गाजलेली ग्रामपंचायत दळे मधील ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ ची पायमल्ली करून,आपल्या अधिकारात लावलेल्या याआधी च्या सर्व सभा, परंतु महसूल गाव होळी जवळपास दहा वर्ष सभाच झाली नसून,या वेळी मात्र ग्रामसभा ससदस्य च्या मागणीनुसार लावण्यात यावी,व नियमबाह्य ऑगस्ट २०२४ ची सभा बाबत कारवाई साठी सर्व होळी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी राजापूर यांकडे पत्र दिले होते,त्या पत्रानुसार दि.२६ ऑगस्ट २४ ला ग्रामपंचायत दळे च्या कार्यलय विस्तार अधिकारी समवेत सुनावणी संपन्न झाली होती.चौकशी तथा विस्तार अधिकारी ( सा.) हुलगुनडे यांच्या अहवालात सरपंच महेश मोरेश्वर करगुटकर सह उपसरपंच, आणि ग्रामविकास अधिकारी हे दोषी आढळले होते.

सदर,विषयींचा अभिप्राय वरिष्ठांना देतात त्यानी आपल्या अहवालात असे म्हटले आज की,सरपंच करगुटकर यांनी आगावू रजा मंजूर करणें आवश्यक असताना याबाबत कारवाई केलेली नाही,नियमबाह्य सभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज केले आहे.सदर प्रकरणी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३८ प्रमाणे कर्तव्यात कसूर केली असून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९( १) अन्वये कारवाईस पात्र अहेत. त्याचप्रमाणे कार्यरत उप सरपंच सरपंच पदाचा कार्यभार नसतांना ग्रामसभेच्या अजेंड्यावर स्वाक्षरी करून नियमबाह्य ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे.आहे.सदर प्रकरणी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३८ प्रमाणे कर्तव्यात कसूर केली असून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार कारवाईस पात्र आहेत.

कार्यरत ग्रामविकास अधिकारी ग्रामसभा आयोजित करताना कार्यरत सरपंच यांच्या नावे स्वाक्षरी ने अजेंडा प्रसिद्ध करावयाचा असताना नियमबाह्य उप सरपंच यांच्या स्वाक्षरी ने काढला आहे.ग्रामसभेचे ठिकाणा मध्ये नियमबाह्य ठिकाणी सभा आयोजित करून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ६० नुसार सचिव यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे.त्यामुळे ते महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा ( शिस्त आणि अपील) नियम १९६४ च्या नियम च्या खंड ( ५),(६),(७) अन्वये शिस्तभंगाची कारवाईस पात्र आहेत. अश्या प्रकारे गटविकास अधिकारी यांना अहवाल दिला आहे,सदर अहवाल एक सदस्य समितीच्या माध्यमातून विस्तार अधिकारी तथा चौकशी अधिकारी गिरी सद्य चे लांजा सहा. गटविकास अधिकारी लांजा तसंच प्रभारी गटविकास अधिकारी राजापूर यांच्या माध्यमातून तब्बल आठ महिन्याने हा अहवाल दि.१०/०६/२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजापूर गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी हा अहवाला इतके महिने का आपल्याकडे जपून ठेवला होता अशा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही,होळीतील पाठपुरावा करणाऱ्या ग्रामस्थांना सुद्धा काही न काही थातूर मातूर उत्तरे देऊन हा विषय दाबन्याचा का प्रयत्न करीत होते असाही एक सवाल निर्माण होत आहे.

तब्बल आठ महिने रखडून ठेवलेल्या या अहवालावर मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात यावर संपूर्ण लक्ष्य आहे.अन्यथा संपूर्ण दळे ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी या विषयी येत्या १५ ऑगस्ट २५ रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात