गुहागर मनसेच्या वतीने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

गुहागर मनसेच्या वतीने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

आबलोली (संदेश कदम) 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष,हिंदुह्दय सम्राट राज साहेब ठाकरे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त मनसे विधानसभा क्षेत्र गुहागरच्या वतीने व मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर येथील श्री व्याडेश्वर मंदिर येथे अभिषेक करण्यात आला तसेच राज साहेबांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त पालपेणे येथे ५७ काजू झाडांची लागवड करण्यात आली. लागवड केलेला सर्व वृक्षांची संगोपन व वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी मनसेने घेतली आहे.यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, गुहागर तालुका सचिव  प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, गुहागर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रथमेश रायकर, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, गुहागर तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष प्रसाद कुष्टे, गुहागर शहर संघटक नंदकुमार जांगळी,  वॉर्ड अध्यक्ष दत्ताराम गिजे, आबलोली शहराध्यक्ष सुमित पवार, कौंढर काळसुर शाखाध्यक्ष सुनील मूकनाक, गुहागर शहर शाखाध्यक्ष गणेश गिजे, महाराष्ट्र सैनिक साहिल कदम,गुहागर उपशहर अध्यक्ष राजा कदम, पाटपन्हाळे  शाखाध्यक्ष सुयोग कुंबेटे, सांस्कृतिक विभाग  अध्यक्ष राहुल जाधव अवनी खांडेकर, सरिता खांडेकर, स्वरा खांडेकर समीक्षा घाणेकर अस्मिता घाणेकर दर्शना गायकर तसेच गावातील महिला व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना विनोद जानवळकर यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी शुभेच्छा दिल्या  तसेच गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले की, राज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे, फळ वृक्षलागवड व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सर्वत्र होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें