वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न.

गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत लेझीम व बँड पथकाच्या तालावर अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये करण्यात आले .शाळेत प्रवेश करता क्षणीच पुष्पवर्षाव करण्यात आला .तसेच शाळा व्यवस्थापन समिती व सुहासिनींद्वारे त्यांचे औक्षण करण्यात आले.त्यावेळी पंचायत समिती गुहागर केंद्र अंजनवेलच्या केंद्रप्रमुख आरोही शिगवण, वेलदूर ग्रामपंचायतीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिक्षण तज्ञ शंकर कोळथरकर ,ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर ,मुख्याध्यापक मनोज पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी सुरक्षा ताई रोहीलकर ,अंगणवाडी सेविका मत्स्यगंधा कोळथरकर, सामाजिक कार्यकर्ते महेश जांभरकर, श्रीराम महिला मंडळाच्या पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रियाताई रोहीलकर, सदस्या अंकिता ताई कोळथरकर ,अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,शिक्षक पालक संघ, माता पालक संघ ,पालक ,ग्रामस्थ ,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांना भेटवस्तू गुलाब पुष्प देऊन पेढे भरवून, आरती करून स्वागत करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले .प्रमुख पाहुणे व पालक यांचे स्वागत करण्यात आले .सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गणवेश यांचे वाटप करण्यात आले.श्री शंकर कोळथळकर, मारुती रोहीलकर ,मनोज पाटील, सुषमा गायकवाड ,सुरक्षा रोहीलकर यांनी मार्गदर्शन केले .अध्यक्ष आरोही रोहीलकर म्हणाल्या वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये नवागतांचे स्वागत अत्यंत नाविन्यपूर्ण व आगळ्यावेगळ्या रीतीने जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले आहे.बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांना त्यांनी धन्यवाद दिले .जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांकरता राबवल्या जात आहेत .वेलदूर नवनगर मराठी शाळा ही उपक्रमशील शाळा असून सदर शाळेमध्ये बाला इव्हेंट स्कूल, वर्चुअल क्लासरूम, शैक्षणिक उठाव यासारखे वरदान ठरणारी योजना राबवून शाळेचे कायापालट करण्यात आले आहे .नवानगर मराठी शाळेच्या विविध उपक्रमांचे त्यांनी भरभरून कौतुक केले .पालकांच्या सहकार्यामुळे शाळेची वरदान नांदेड, जळगाव मुंबई ,वर्धा ,कोल्हापूर या पाच ठिकाणी राज्यस्तरीय शिक्षणाची वारी या माध्यमातून राज्यस्तरावर निवड झाली असून शाळेने गुणवत्ता च्या क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेतली आहे.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुद्दमवार व आभार प्रदर्शन धन्वंतरी मोरे यांनी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी
Play sound