विद्यार्थी जीवनात अध्ययनाचा संकल्प व संस्कार गरजेचे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 विद्यार्थी जीवनात अध्ययनाचा संकल्प व संस्कार गरजेचे

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नवी मुंबई (मंगेश जाधव)

विद्यार्थ्यांनी अध्ययन व स्वप्रगतीसाठी संकल्प करून त्याला संस्काराची जोड देणे गरजेचे आहे, असे अमृतमय मार्गदर्शन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना केले.

श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशन इन्स्टिट्यूट या प्रशालेच्या वतीने

शारीरिक ,मानसिक ,अध्यात्मिक तसेच बौद्धिक विकास व्हावा यासाठी वर्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज व गुरुमाता सौ. सुप्रियाताई यांच्या हस्ते करण्यात आले.

पुष्पमाला अर्पण करून उभयतांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे चेअरमन अर्जुन फुले, परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण प्रशालेचे श्री लघाटे, गुरुकुल विभाग प्रमुख श्री मोने व सौ. मोने, संस्थानचे मुख्य विश्वस्त शांताराम दरडी,मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर,कुंडलिकराव वायभासे व अन्य संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्याध्यापिका डॉ. सौ अबोली पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्षारंभ उपासना कार्यक्रमाला प्रारंभ केला. या कार्यक्रमानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना आपल्या अमृतमय वाणीतून उद्बोधन केले. ते म्हणाले, “संकल्प ही भावना आपल्या मनामध्ये रुजण्यासाठी उदार अंत:करणाची व उदात्त भावनेची नितांत गरज असते. आम्ही अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका, इंग्रजी माध्यमाची शाळा, वेद पाठशाळा असे विविध संकल्प केले होते व ते आज सत्यात उतरलेले आहेत. हाच वारसा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या अध्ययनामध्ये व स्वप्रगतीसाठी संकल्प करावेत व त्याला संस्काराची जोड द्यावी.”

ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांत सकारात्मक ऊर्जा, मनाचे पावित्र्य, आचारामध्ये शुद्धता निर्माण व्हावी यासाठी अग्निहोत्राचा उपक्रम प्रशालेमध्ये सुरू करण्यात आला आहे. आज ही आज काळाची गरज आहे.विद्यार्थ्यांवर प्रशालेत केले जाणारे संस्कार हे दृढ होतात.”

त्यानंतर प्रशालेचे चेअरमन अर्जुन फुले यांनीही शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ त्रिशा सुवारे व सौ संस्कृती ठोंबरे यांनी केले. आभार सौ. वृषाली भोगटे यांनी मानले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा