जि.प.आदर्श केंद्र शाळा खेर्डी नं. १ येथे शाळा प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जि.प.आदर्श केंद्र शाळा खेर्डी नं. १ येथे शाळा प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) 

चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा खेर्डी नं. १ येथे नुकताच शाळा प्रवेशोत्सव दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी शाळा प्रवेशोत्सव दिनाची सुरुवात इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थांचे सजावट केलेल्या गाडीमधून ढोल ताशांच्या गजरात अत्यंत उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यार्थांचे शालेय परिसरात आगमन होताच औक्षण करण्यात आले व विद्यार्थांवर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर आकर्षक अशा सेल्फी पॉईंट मध्ये विद्यार्थांचे आणि मान्यवरांचे फोटोग्राफ्स घेण्यात आले त्यानंतर विद्यार्थांच्या स्वागतासाठी फुलांचा गालिचा टाकण्यात आला या गालिच्यावरुन चालताना विद्यार्थांचा आनंद ओसांडून गेला होता

सभागृहात प्रवेश करताना विद्यार्थांच्या पहिल्या पावलांची “पाऊलखुण ” अर्थात पायांचा ठसा घेण्यात आला “पाऊल खुणा” उमटवणे हा विद्यार्थांसाठी एक आगळा वेगळा अनुभव होता. विद्यार्थांचे शाळेतील पहिले पाऊल अर्थात “पाऊल खुण” रुपाने दिर्घकाळ टिकून राहाव्यात यासाठी हे ठसे पालकांकडे सुपूर्त करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या सजावट केलेल्या वर्गाचे उदघाटन खेर्डी गावचे उपसरपंच अभिजीत खताते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन वर्गात प्रवेश केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रवेशोत्सवा निमित्त सभा घेण्यात आली. यावेळी सुत्रसंचालन करताना पदवीधर शिक्षक दिपक रूपात यांनी “शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा, शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी” अशी काव्यरचना सादर करुन मान्यवरांचे शाब्दिक स्वागत केले व शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ सदस्य अनंत दाभोळकर यांची अध्यक्ष म्हणून निवड केली त्यास उपशिक्षिका श्रीमती. त्रिशला तलवारे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन प्रवेशोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.

त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. माधवी जंगम यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, उपसरपंच अभिजीत खताते यांचे हस्ते इयत्ता पहिली मध्ये दाखल होणा-या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प पाठ्यपुस्तक, गणवेश, चॉकलेट आदी. भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले तसेच माजी उपसरपंच व भारतीय जनता पक्षाचे चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद भूरण यांचे हस्ते व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर खेर्डी केंद्र प्रमुख दिपक यादव यांचा विनोद भुरण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षिका श्रीमती. कल्याणी भागवत यांनी अभ्यासक्रमातील बदल आणि शिक्षकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर विनोद भुरण यांनी प्रवेशोत्सवाचे महत्त्व स्पष्ट करुन शुभेच्छा दिल्या त्यानंतर केंद्रप्रमुख दिपक यादव यांनी विद्यार्थांसाठी जि.प.च्या योजना सांगून विद्यार्थ्यांना जि. प. शाळेतच दाखल करण्याचे आवाहन केले. अनंत दाभोळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती. नेहा सुर्वे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका माधवी जंगम, उपशिक्षिका श्रीमती. शर्वरी खताते, श्रीमती. सायली वरेकर, श्रीमती. चव्हाण, श्रीमती. भागवत, श्रीमती. सुर्वे, श्रीमती. गुरव, दिपक रेपाळ. श्रीमती. तलवारे, वाघडोळे, फोटो ग्राफर दिपक वाघडळे यांनी विशेष परिश्रम घेतले

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

पाषाणाला लाभले 'देवपण'; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः 'भक्ती' १५ वर्षांची तपश्चर्या: कोदंबी पाषाण आणि लाकडातून साकारल्या...
Read More
पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव आबलोली (संदेश कदम) सम्यक कोकण कला संस्था (रजि.)...
Read More
गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव