पडवे ग्रामपंचायतीचे सरपंच मनेष बाईत गवाणवाडीच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत; योगेश दादांच्या कार्यशैलीवर प्रभाव!

 

???? पडवे ग्रामपंचायतीचे सरपंच मनेष बाईत गवाणवाडीच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत; योगेश दादांच्या कार्यशैलीवर प्रभाव!

???? योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास; प्रताप घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश सोहळा संपन्न

मंडणगड (प्रतिनिधी) – मंडणगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पडवेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच मनेष बाईत यांनी गवाणवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार योगेश दादा कदम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला.

या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन शिवसेना तालुका प्रमुख प्रताप दादा घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या कार्यक्रमात विभाग प्रमुख इरफान भाई बुरोंडकर यांचीही विशेष भूमिका होती. श्री. बाईत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नामदार योगेश दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या वेळी दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सुधीर भाऊ कदम, मंडणगड तालुका संपर्क प्रमुख शंकरजी बांद्रे, उमरोली जिल्हा परिषद गटाचे शिवसेना समन्वयक अजय शिगवण, युवासेना मुंबई समन्वयक अमोल वैराग तसेच युवासेना उपतालुका संघटक सचिनजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

???? #शिवसेना #मंडणगड #पडवेग्रामपंचायत #मनेषबाईत #योगेशकदम #प्रतापघोसाळकर #राजकारणबातमी #रत्नागिरीवार्ताहर

 

???? फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें