गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचा १००% निकालाचा डंका: दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचा १००% निकालाचा डंका: दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न

खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल आणि खातून अब्दुल्ला सेकंडरी स्कूलमध्ये गुणवंतांचा गौरव; शिक्षण हेच यशाचे एकमेव साधन – डॉ. मोहम्मद अ. मुकादम

चिपळूण (योगेश पेढांबकर): गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल आणि खातून अब्दुल्ला सेकंडरी स्कूल, गोवळकोट येथे १०वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मरहूम मोहम्मद शमशुद्दीन खतीब असेंब्ली हॉलमध्ये उत्साहात पार पडला. संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. इसहाक खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. इरफान शेख यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मौलाना आझाद अल्पसंख्याक विभाग कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबईचे संचालक डॉ. मोहम्मद असगर मुकादम उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून करिअर मार्गदर्शक श्री. अखलाख अहमद शेख, मुंबई यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. श्री. इसहाक खतीब, श्री. पटेल अजमल फजलुद्दीन, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उरुसा खतीब, तसेच कु. ॲड. सुमय्या मुजाहिद मेयर, श्री. निसार कादिर कटमाले (अध्यक्ष मिनारा मस्जिद गोवळकोट), श्री. हारून अ. कादिर घारे (अध्यक्ष इतिहादुल मुस्लिमिन गोवळकोट), श्री. नईम रहमान चौगुले (अध्यक्ष नव तनजिम इस्लामिया गोवळकोट), श्री. अजीम अ. गफूर घारे, अ. रऊफ गुलाम मोहिदिन सुर्वे (केंद्रप्रमुख, गोवळकोट विभाग पंचायत समिती चिपळूण) आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे विद्यमान सेक्रेटरी श्री. मुजाहिद मेयर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यालयाने यावर्षी १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. कु. इरम अफजल घारे (९५.४०%), कु. झीनत फिरोज म्हमदुले (९३.००%), कु. मोहम्मद साद सरफराज गोठे (९१.००%), कु. ओमेमा रफिक अहमद ढेनकर (९०.४०%), कु. हुदा अ. मन्नान इनामदार (९०.००%) यांनी अनुक्रमे गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील एकूण २७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये, १२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये, तर ६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीमध्ये यश मिळवले. यावर्षी एकूण ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत शाळा आणि गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवर आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन डॉ. श्री. इसहाक खतीब यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. मोहम्मद असगर मुकादम (संचालक, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, मुंबई) यांचा विशेष सत्कार डॉ. इसहाक खतीब यांनी केला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. इरफान शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रतिष्ठित मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी श्री. मुजाहिद मेयर यांनी केले. करिअर मार्गदर्शक श्री. अखलाक अहमद शेख यांनी आपल्या प्रभावी शैलीत शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य आणि विशेष मार्गदर्शन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही उत्तम यश संपादन करत असल्याचा त्यांना अभिमान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आणि संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. श्री. इसहाक खतीब यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी उत्तम शिक्षकांची आवश्यकता असते आणि ते आपल्या संस्थेत असल्यामुळेच असे उत्तम विद्यार्थी घडत आहेत, असे गौरवोद्गार काढले. त्यांनी संस्थेला दिलेल्या भरीव योगदानाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि संस्थेचे यश उत्तुंग राहण्यासाठी सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा अपेक्षित असल्याचे सांगितले. शेवटी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले आणि अल्पोपाहार देण्यात आला.

याप्रसंगी गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अ. अजीज रज्जाक बेग, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. शहाबुद्दीन सुर्वे, संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. जफर कटमाले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उरुसा खतीब, विद्यमान सेक्रेटरी श्री. मुजाहिद मेयर, सल्लागार सौ. नादिया खतीब, सदस्या झरिना चौगुले, सौ. नुरी हळदे, विद्यमान सदस्य श्री. लियाकत खतीब, श्री. अखलाक मेयर, संस्थेचे खजिनदार श्री. जहीर नाखुदा, शाळेचे मुख्याध्यापक श्री. इरफान शेख, तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी श्री. मुजाहिद मेयर आणि विद्यालयच्या शिक्षिका सौ. नमीरा साटविलकर व कु. अलमिरा वांगडे यांनी प्रभावीपणे केले आणि सर्वांची मने जिंकली.

#Hashtags:

#गोवळकोटएज्युकेशनसोसायटी #खदिजाइंग्लिशमीडियमस्कूल #खातूनअब्दुल्लाहसेकंडरीस्कूल #दहावीचानिकाल #गुणवंतविद्यार्थी #सत्कारसोहळा #१००टक्केनिकाल #चिपळूण #शिक्षण #यश #डॉमोहम्मदमुकादम #करिअरमार्गदर्शन #विद्यार्थीसन्मा

न #गोवळकोट

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरी जिल्ह्यात ११४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; २८ एप्रिलला मतदान

  रत्नागिरी जिल्ह्यात ११४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; २८ एप्रिलला मतदान १७४ रिक्त पदांसाठी होणार निवडणूक प्रक्रिया; आचारसंहिता लागू होताच ग्रामीण...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यात ११४ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; २८ एप्रिलला मतदान

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे ‘विविध गुणदर्शन’ सोहळा जल्लोषात; आदिवासी ‘तारपा’ नृत्याने लुटली वाहवा!

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे 'विविध गुणदर्शन' सोहळा जल्लोषात; आदिवासी 'तारपा' नृत्याने लुटली वाहवा! शिक्षकांना भावूक निरोप; तवसाळ तांबडवाडी ग्रामस्थ,...
Read More
आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे ‘विविध गुणदर्शन’ सोहळा जल्लोषात; आदिवासी ‘तारपा’ नृत्याने लुटली वाहवा!

पाटपन्हाळे हायस्कूलची अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड

पाटपन्हाळे हायस्कूलची अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड आबलोली (संदेश कदम) जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर होऊन गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल...
Read More
पाटपन्हाळे हायस्कूलची अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड

श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील “खेळ पैठणीचा” उत्साहात आणि जल्लोषात संपन्न

श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील "खेळ पैठणीचा" उत्साहात आणि जल्लोषात संपन्न सौ. श्रावणी पागडे पैठणीची प्रथम मानकरी तर सौ.वृषाली...
Read More
श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील “खेळ पैठणीचा” उत्साहात आणि जल्लोषात संपन्न

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला! बुकिंग होऊनही सिलिंडर मिळेना, पण 'ओटीपी' आला! ५२ सिलिंडरचा परस्पर काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा...
Read More
गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

:गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची 'नवोदय'साठी निवड ग्रामीण भागातून यशाची उंच भरारी; ९३.७५% गुण मिळवून पटकावला...
Read More
गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

*जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त* राजापूर दि.२३ (प्रशांत पवार ) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे...
Read More
जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर