साखरपा-संगमेश्वर रस्त्याची दयनीय अवस्था – ३२ कोटी खर्चूनही खड्डेच खड्डे!

� साखरपा-संगमेश्वर रस्त्याची दयनीय अवस्था – ३२ कोटी खर्चूनही खड्डेच खड्डे!

 

➡️ गणेशोत्सव तोंडावर, बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

➡️ खाजगी कंपन्यांकडून रस्त्यांवर अनधिकृत खोदकाम

➡️ नागरिक त्रस्त – फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

 

संगमेश्वर – साखरपा ते संगमेश्वर दरम्यानचा ३२ किलोमीटरचा रस्ता तब्बल ३२ कोटींपेक्षा अधिक निधी वापरून तयार करण्यात आला असला तरी, या रस्त्याची सध्याची अवस्था अत्यंत बिकट असून नागरिकांचा संताप वाढत आहे.

 

बुरंबी स्टॉपजवळ मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे रस्त्याची आणखीच चाळण झाली आहे. गणपती सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना देखील बांधकाम विभागाने या रस्त्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

 

मुरादपूर तिठ्यावर खाजगी कंपनीकडून परवानगीशिवाय रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून, रस्त्याच्या कडेला होणाऱ्या खोदकामामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. रस्त्याच्या बाजूंना अपुरे बांधकाम आणि देखभाल नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

 

स्थानिक नागरिकांच्या मते, “३२ किलोमीटरसाठी ३२ कोटी खर्चूनसुद्धा जर रस्ता अशा अवस्थेत असेल, तर हे जनतेच्या पैशांची उधळपट्टी नाही का?” असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांनी याबाबत बांधकाम विभागावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

📣 स्थानिक प्रशासनाकडे मागणी

रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी

खाजगी कंपन्यांकडून खोदकामास प्रतिबंध घालावा

दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात

 

 

 

—

 

 

#साखरपा #संगमेश्वर #रत्नागिरी_बातमी #खड्ड्यांचा_रस्ता #बांधकाम_विभाग #गणपतीउत्सव #रत्नागिरी_न्

 

 

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें