सडे जांभारीच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी सलग ११ व्या वर्षीहि अनिल सुर्वे यांची बिनविरोध

सडे जांभारीच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी सलग ११ व्या वर्षीहि अनिल सुर्वे यांची बिनविरोध निवड…..

आबलोली (संदेश कदम)……..

गुहागर तालुक्यातील सडे जांभारी गावाची ग्रामसभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली यावेळी तंटामुक्ती निवडीचा विषय ग्रामसेवक अपूर्वा हुमणे यांनी सभागृहासमोर मांडला. यावेळी श्री.पांडुरंग बारस्कर यांनी अध्यक्षपदासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल सुर्वे यांच्या नावाची सलग ११ व्या वर्षीहि बिनविरोध निवड करण्यात यावी अशी सूचना आणली या सुचनेला सभागृहाने एकमताने अनुमोदन दिले. आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला .सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल शंकर सुर्वे यांनी सलग १० वर्ष तंटामुक्ती अध्यक्षपदाचा कार्यभार उत्तमरित्या सांभाळला त्यांनी गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी आजपर्यंत महत्वाचे योगदान दिले असुन ते दुसऱ्यांच्या सुखःदुखात , अडीअडचणीत , समाजकार्यात धावून जातात अशी त्यांची ख्याती आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन गावातील एकोपा – बंधूभाव अबाधित ठेवण्यासाठी कटीबद्ध रहाणार असल्याचे स्पष्ट मत श्री.अनिल सुर्वे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
सडेजांभारी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सलग ११ व्या वर्षी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच श्रीमती. वनिता डिंगणकर, ग्रामसेवक अपूर्वा हुमणे, ग्रा.पं सदस्य – सदस्या , माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप सुर्वे ,दोन्ही गावचे पोलिस पाटील तसेच ग्रामस्थ अनंत तटकरे, पांडुरंग बारस्कर , अनंत सुर्वे , शंकर दावडे , माजी सरपंच अंकुश माटल,शाळा नं.१ चे मुख्याध्यापक अमोल होवाळे, राऊत सर, ग्रामसंघांच्या अध्यक्षा स्वाती सुर्वे,अंगणवाडीच्या सुर्वे ताई यांचेसह ग्रामसभेला उपस्थित सर्व सदस्य यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल सुर्वे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें