माजी जि.प.सदस्य अशोक पारदळे पुन्हा भाजपमध्ये..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माजी जि.प.सदस्य अशोक पारदळे पुन्हा भाजपमध्ये..!
डॉ.विनय नातू यांनी जुन्या सहका-याचे केले उत्साहात स्वागत..!

आबलोली (संदेश कदम)….

गुहागर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते नेते श्री.अशोक पारदळे हे १२ वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर या राजकीय पक्षाच्या प्रवाहात सामील झाले आहेत. श्री. अशोक पारदळे हे पेवे गावचे सरपंच,पेवे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य अशी विविध पदे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी भूषविलेली असताना काही तात्विक कारणांमुळे २०१२ सालात श्री.अशोक पारदळे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत तत्कालीन आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र १२ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा श्री.अशोक पारदळे भाजपवासी झाले आहेत. आपल्या या जुन्या जाणत्या व विश्वासू सहका-याचे गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी उत्साहात स्वागत केले.श्री.अशोक पारदळे यांच्या पुनर्रप्रवेशाच्या वेळी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, अशोक पारदळे यांचे जुने सहकारी गुहागर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती बावाशेठ भालेकर,आरेचे माजी सरपंच श्रीकांत महाजन, कारुळचे माजी सरपंच मंगेश जोशी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश चौगुले,आरेचे माजी उपसरपंच साईनाथ कळझुणक,भाजपाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हिदायत भाई मुखरी, सरचिटणीस सचिन ओक, अंकुश पिलवलकर, गुरुनाथ कारेकर आदींसह बहुसंख्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे गतवैभव या गुहागर विधानसभेमध्ये पुन्हा उभे करण्यासाठी, नातूसाहेबांना पुन्हा विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी मी कटिबद्ध असून मी माझ्या जिल्हा परिषद गटापुरताच नव्हे तर संपूर्ण गुहागर तालुका पिंजुन काढणार असून शतप्रतिशत भाजपासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याचे अशोक पारदळे यांनी सांगितले आहे. पारदळे यांच्या पुर्नप्रवेशामुळे गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या पुढील कालखंडात निवडणुकांपर्यंत अनेक जुने जाणते विश्वासू सहकारी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होणार असुन जुन्या जाणत्या सहकाऱ्यांबरोबरच विरोधी गटातील अनेक नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सांगितले.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन