शासकीय कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत ओळखपत्र बंधनकारक.

शासकीय कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत ओळखपत्र बंधनकारक

▶️ जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर 

  यांच्या तक्रारीची शासनाने घेतली दखल

वार्ताहर (चिपळूण):-

माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.योगेश तानु पेढांबकर हे गोर – गरिबांच्या अडी – अडचणी सोडविण्यासाठी आज सातत्याने 10 वर्षे पाठपुरावा करीत अनेक महिलांना व इतर व्यक्तींना न्याय व शासकीय लाभ मिळवून दिला आहे. अशी कार्यालयीन कामे करीत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ,खेड तालुक्यामधील विशेषत: खेड भूमिअभिलेख कार्यालयात कधीही ओळखपत्र व नाव विचारणा केल्यास कशासाठी अशा पद्धतीची उत्तरे देण्यात येतात.याबाबत वरिष्ठांशी बोलून व तक्रार दाखल करून कार्यवाही तातडीने करावी अशा पद्धतीचे पत्र नुकतेच शासनाकडे केले होते.राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयात येत असतात, त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहित होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे. *परंतू शासनाच्या असे निर्देशनास आले आहे की*, *शासकीय कार्यालयात हजर असलेले संबंधित अधिकारी/कर्मचारी हे दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नाहीत.ओळखपत्राबात एखाद्या नागरिकांने विचारणा केली असता शासकीय अधिकारी/कर्मचारी ओळखपत्र दाखवित नाहीत*. या सर्व बाबी विचारात घेता सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे, जेणेकरून याबाबत नागरिकांची तक्रार प्राप्त होणार नाही. याची दक्षता घ्यावी. सदर सूचनांची अमंलबजावणी करण्यास कुचराई करणा-या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्याविरूध्द योग्य ती कारवाई करणेत येईल.

अशा आशयाचे पत्र नुकतेच सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख मार्गदर्शक व जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ,महा.राज्य यांना देण्यात आले आहे.

तसेच याबाबतच्या सूचना कोंकण विभाग, ठाणे, रत्नागिरी,सिंधुदुर्ग,नवी मुंबई,पालघर या जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयात.व अधिनस्त कार्यालयांना तात्काळ सूचना व पत्र देण्यात आले आहे.कुचराई करणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.असे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत सर्व स्तरातून सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य चे प्रमुख मार्गदर्शक याचे कौतुक करण्यात येत आहे. अशा विधायक कार्यासाठी महाराष्ट्रातूनअनेक नागरिकांचा श्री.योगेश पेढांबकर यांना पाठिंबा मिळत आहे.

शासकीय कामात अथवा इतर कोणत्याही कामामध्ये काम होत नाही,अडले आहे असे वाटल्यास माझ्याशी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करण्यात यावा.तसेच,शासकीय योजना याबाबत काही अडचणी असल्यास अथवा कोणत्याही शासकीय योजना बाबत

महाराष्ट्र राज्य प्रमुख मार्गदर्शक – माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य.

यांना थेट मो.८७६७३१११४९/८१४९५९२६०६ या क्रमाकावरती संपर्क करावा.असे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें