पत्रकार आशिष कारेकर यांना मातृशोक

पत्रकार आशिष कारेकर यांना मातृशोक

आबलोली (प्रतिनीधी)

गुहागर तालुक्यातील तळवली भेळेवाडी येथील रहिवासी व दैनिक प्रहारचे गुहागर तालुका प्रतिनिधी, पत्रकार आशिष कारेकर यांच्या मातोश्री कै. सुजाता सुरेश कारेकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या 69 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी सोमवारी दुपारी 2 वाजता दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने तळवली परिसरात शोककळा पसरली आहे.
कै. सुजाता कारेकर यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ व प्रेमळ होता. गेले काही दिवस त्या आजारी होत्या.मुंबई येथे उपचार करून त्यांना आपल्या तळवली येथील राहत्या घरी आणले असता सोमवारी दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. तळवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि.10 रोजी तळवली स्मशानभूमी येथे तर बारावे विधी शुक्रवार दि.12 व उत्तरकार्य शनिवार दि.13 रोजी तळवली येथील राहत्या घरी पार पडणार आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें