नवेदर येथे गणेश विसर्जनावेळी तरुणाचा बुडून मृत्यू

नवेदर येथे गणेश विसर्जनावेळी तरुणाचा बुडून मृत्यू

राजापूर – संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यातील आडिवरे परिसरातील कोंडसर बुद्रुक, नवेदर येथे गणपती विसर्जनादरम्यान एका वीस वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे. विक्रांत संतोष पोकळे (२०) असे मयत तरुणाचे नाव आहे.
राजापूर तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून मंगळवारी गौरी गणपतीचे विसर्जनही मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले दरम्यान कोंडसर बुद्रुक नवेदर येथील गणपतीचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. नवेदर गावातील गणपतींचे गावातीलच एका तळ्यात विसर्जन केले जाते. मंगळवारी सायंकाळी गावातील सर्व ग्रामस्थ गणपतींचे विसर्जन करून घरी परतल्यानंतर विक्रांत संतोष पोकळे हा युवक घरी परत न आल्याने कुटुंबीयांसह वाडीतील ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता विक्रांत हा गणपती विसर्जन करण्यात येणाऱ्या तळ्यात बुडून मयत झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेने नवेदर गावातील गणेशोत्सवाला गालबोट लागले असून पूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.

 

#Rajapur News #Ganesh visarjan #Breaking news #Ratnagiri news

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें