भरधाव कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू!

भरधाव कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू!

निवळी उतारावरील भीषण अपघातात चालकाचा जागीच जीव वाचला नाही

रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी उतारात भरधाव कंटेनर उलटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या चालकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.

मृत चालकाचे नाव सुभाष जगतपाल वर्मा (वय 23, छतरपूर – उत्तर प्रदेश) असे असून तो (एमएच 46 बीबी 1537) क्रमांकाच्या कंटेनरने ऑक्सिजन व हेलियम गॅस घेऊन जयगड ते मुंबई या मार्गावर जात होता. बावनदी-सुतारवाडी येथील उतारातील वळणावर भरधाव वेगामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर उलटला.

या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुभाषला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून कंटेनर बाजूला करण्यात येत वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

 


🔖 हॅशटॅग्स :

#Ratnagiri #MumbaiGoaHighway #Accident #ContainerAccident #BreakingNews


📸 फोटो

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें