सोलेगाव येथील शिवना नदीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.
जिवन आनंदराव मावस
(गंगापूर | प्रतिनिधी)
गंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथे गायरानजवळील शांत शिवना नदी रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी एका अनोख्या घटनेची साक्षीदार ठरली. नदीच्या पाण्यावर वर तरंगणारा अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह दिसून येताच गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
ढोर चारण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांच्या नजरेस हा मृतदेह पडताच त्यांनी तातडीने गावचे पोलिस पाटील शिवाजी उमाप यांना माहिती दिली. थोड्याच वेळात गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंग राठोड, उपनिरीक्षक औदुंबर मस्के, बीट जमादार मनोज घोडके, पद्माकर जाधव, विजय नागरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शुभम वाघमारे यांच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे उत्तरणीय तपासणीसाठी हलविण्यात आला.
मृत व्यक्तीच्या अंगात राखाडी रंगाची पॅन्ट व जांभळ्या पट्ट्याचा टी-शर्ट होता. मृतदेह अंदाजे पाच-सहा दिवसांपासून पाण्यात असल्याने चेहरा विद्रूप झाला असून माशांनी तो खाल्ल्याने ओळख पटणे कठीण झाले आहे.
गंगापूर पोलिसाचा मात्र या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून मृताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.















