संस्कृत उपकेंद्राला १ एकर जागा; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रलंबित गुणपत्रिका तात्काळ द्याव्यात – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

🔹 रत्नागिरीत लोणेरे विद्यापीठाचे उपकेंद्र!

🔹 संस्कृत उपकेंद्राला १ एकर जागा; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रलंबित गुणपत्रिका तात्काळ द्याव्यात – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

 

रत्नागिरी (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन करण्याचा निर्णय झाला असून, रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्रासाठी १ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रलंबित गुणपत्रिका व प्रोव्हिजन प्रमाणपत्रे तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विद्यापीठाला दिल्या.

 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या आढावा बैठकीस तब्बल तीन तास चर्चा झाली. यात शासकीय तंत्रनिकेतन, आयटीआय, कौशल्य विकास केंद्र, संस्कृत अध्ययन उपकेंद्र, परिचारिका महाविद्यालय, औषधनिर्माण महाविद्यालय यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.व्ही. काळे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

 

डॉ. सामंत यांनी अल्पसंख्याक मुलींना वसतिगृह प्रवेशासाठी प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. तसेच, नाविन्यपूर्ण योजनेतून आयटीआय विद्यार्थ्यांना ॲप्रन व बूट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या करिअर संधीसाठी कॅम्पस मुलाखती आयोजित कराव्यात, असेही ते म्हणाले.

 

 

📌 हॅशटॅग्स :

 

#रत्नागिरी #उदयसामंत #विद्यापीठ #लोणेरे #संस्कृतउपकेंद्र #अभियांत्रिकीविद्यार्थी #गुणपत्रिका #शिक्षणविकास

 

 

 

📸 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें