नेपाळी तरुणाईचा हिरो, बालेन शाह!

🔥 Breaking News नेपाळी तरुणाईचा आवाज, बालेन शाह!

काठमांडू : नेपाळमधील तरुणाईच्या वाढत्या हिंसक आंदोलनामुळे देशात सध्या अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला असून, लष्कराने सूत्रे हाती घेतली आहेत. सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे तरुण वर्ग अधिकच आक्रमक झाला आहे. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी मात्र बालेन शाह (बालेंद्र शाह) यांचं नाव समोर येत आहे. काठमांडूचे महापौर असलेले बालेन शाह तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या याच लोकप्रियतेमुळे ‘टाइम’ मासिकाने २०२३ च्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांना स्थान दिलं होतं.

नेपाळमधील जेन-झी (Gen-Z) च्या या आंदोलनाला बालेन शाह यांनी पाठिंबा दिल्याने ते चर्चेत आले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते एक रॅपर होते आणि सिव्हिल इंजिनीअर म्हणूनही त्यांनी काम केलं. जुन्या आणि प्रस्थापित राजकीय पक्षांवरून तरुणाईचा भ्रमनिरास झाल्यामुळे बालेन शाह हे त्यांच्यासाठी एक नवीन आशा बनले आहेत.

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमातील काही संवादांवर त्यांनी आक्षेप घेतला होता. ते संवाद चित्रपटातून न काढल्यास नेपाळमध्ये कोणताही भारतीय सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.

 


#नेपाळ #बालेनशाह #नेपाळआंदोलन #युवाशक्ती #काठमां

डू

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें