रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आता महिला राज    अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) जाहीर

 

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आता महिला राज 

  अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) जाहीर

मिळणार अडीच वर्षाचा कालावधी!!!

तर रायगड व सिंधुदुर्ग मध्ये सर्वसाधारण महिला!!

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित

 

मुंबई —-

महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांसाठी नवीन आरक्षण जाहीर केले आहे.

 

यानुसार, रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

 

या घोषणेमुळे राज्यातील राजकारणात, विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये, एक नवीन समीकरण उदयास आले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या पदांचे आरक्षण नव्याने निश्चित केले आहे.

 

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा वगळता, उर्वरित जिल्हा परिषदांसाठी हे आरक्षण पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी लागू असणार आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या ६ मे २०२५ रोजीच्या आदेशानुसार, या आरक्षणांची पुनर्रचना करण्यात आली आहे.

 

या अधिसूचनेमध्ये, विविध जिल्ह्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणाची यादी जोडण्यात आली आहे.

 

यानुसार, काही प्रमुख जिल्ह्यांमधील आरक्षणाची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

 

🔴 ठाणे: सर्वसाधारण (महिला)

🔴 पालघर: अनुसूचित जमाती

🔴रायगड: सर्वसाधारण

🔴 रत्नागिरी: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

🔴सिंधुदुर्ग: सर्वसाधारण

🔴 नाशिक: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

 

🔴धुळे: अनुसूचित जमाती

🔴जळगाव: सर्वसाधारण

 

या नवीन आरक्षणामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी हे पद ज्या प्रवर्गाकडे होते, आता ते बदलल्याने इच्छुकांच्या संधींमध्ये बदल होणार आहे.

 

या निर्णयामुळे महिला उमेदवारांना आणि विशेषतः नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांना नेतृत्व करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

 

आता रत्नागिरी जिल्ह्यातील

भाजप, शिंदे शिवसेना, उबाठा, व राष्ट्रवादी पक्ष यामध्ये कोणाला संधी मिलते हे पहावे लागणार आहे.

 

तसेच या अध्यक्ष पदासाठी कोणी कुणबी मराठा ही जात घेऊन नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडणूक लढवली जाऊ शकते का हे पहावं लागणार आहे.

 

तसेच स्थानिक पातळीवर भाजप शिंदे शिवसेनेशी युती करत का ते पहावं लागणार आहे.

कारण अद्याप ही भाजप कडून महायुती बाबत काहीच सांगितले जात नाही आहे

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें