💥 रत्नागिरीत लाच प्रकरणात तिघे रंगेहाथ; एसीबीची धडक कारवाई
लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी २५ हजारांची मागणी; सहाय्यक संचालकासह तिघे अटक
रत्नागिरी – रत्नागिरीत स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील सहाय्यक संचालकासह तिघांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. २५ हजारांची लाच मागण्यात आली होती, त्यापैकी १६ हजार ५०० रुपये स्वीकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी असे –
- शरद रघुनाथ जाधव (५३) – सहाय्यक संचालक, वर्ग-१, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरी
- सतेज शांताराम घवाळी (३८) – कंत्राटी शिपाई, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरी
- सिद्धार्थ विजय शेट्ये (४५) – सहाय्यक लेखा अधिकारी, वर्ग-३, वित्त विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी
तक्रारीनंतर सापळा
दापोली पंचायत समितीत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक लेखा अधिकाऱ्याने ११ सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यांचा कार्यालयीन लेखापरीक्षण अहवालातील २१ प्रलंबित मुद्दे वगळण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती. ११ सप्टेंबर रोजी रात्री ७.४६ वाजता स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी, शिपाई घवाळीने तक्रारदाराकडून १६ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारली व ती शेट्ये यांच्याकडे दिली. त्यानंतर एसीबी पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले.
कारवाई
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७(अ) आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक सुहास रोकडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांना पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सपोफौ उदय चांदणे, पोहवा विशाल नलावडे, पोहवा संजय वाघाटे, पोहवा दीपक आंबेकर, पोशि हेमंत पवार आणि पोशि राजेश गावकर यांनी साथ दिली.
नागरिकांना आवाहन
एसीबी, रत्नागिरीने जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणत्याही प्रकारे लाच मागितल्यास तातडीने तक्रार नोंदवावी.
📞 एसीबी, रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक : ०२३५२ २२२८९३
📞 टोल फ्री क्रमांक : १०६४
📸 फोटो
🔖 हॅशटॅग्स
#Ratnagiri #ACB #LachaluChapat #BreakingNews #AntiCorruption #Maharashtra















