कबड्डी क्रिडा स्पर्धेत ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

रत्नागिरी शालेय तालुकास्तरीय कबड्डी क्रिडा स्पर्धेत मुलींचा डंका

 

श्रमिक विद्यालय शिवार आंबेरे रत्नागिरीच्या मुली कबड्डी क्रिडा स्पर्धेत ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

रत्नागिरी – संदीप शेमणकर 

रत्नागिरी तालुकास्तरीय शालेय 14 वर्षे वयोगट मुली कबड्डी क्रीडा स्पर्धेमध्ये श्रमिक विद्यालय, शिवार आंबेरे या विद्यालयातील विद्यार्थिनींनी कबड्डी या सांघिक क्रीडा प्रकारात विजय संपादन करून आपल्या विद्यालयाचे नाव लौकिक केले आहे. या कबड्डी संघामध्ये तन्वी नवाथे, श्रावणी नवाथे, मानसी तोस्कर, स्वरा भडेकर, आर्या दळवी, सिमरन कुवार, नुपूर डोर्लेकर, निधी पवार, श्रावणी पाटील, स्नेहल कुवार, सृष्टी मोर्ये, आदिती मिरजुळकर इत्यादी विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. या सर्वच विद्यार्थ्यांनी सांघिक चांगली कामगिरी करून “प्रथम क्रमांक” प्राप्त केलेला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच क्रीडा शिक्षक राकेश आंबेकर, दिवाकर तरळ यांचे प्राचार्य मधुकर थुळ, संस्था पदाधिकारी, हितचिंतक यांनी हार्दिक अभिनंदन केले. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें