ग्रुप ग्रामपंचायत सोवेली तेरडी ता.मंडणगड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण
मंडणगड _वार्ताहर
सोवेली दि . १७ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत सोवेली तेरडी च्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय शाळा सोवेली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उद्घाटन कार्यक्रमाचे टिव्ही च्या माध्यामातून उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ यांना लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले यावेळी सौ.कल्याणी मुळे मॅडम ( प्रशासक सोवेली ) व श्री. सुनिल आईनकर सर ( नोडल अधिकारी ) यांनी या विषयावर संपूर्ण माहीती दिली तसेच श्री.संकेत तांबे ( मा.उपसरपंच ) यांनी सांगीतले की या अगोदर सुद्धा आपल्या ग्रामपंचायत ने विविध स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवले आहेत २०२१ मधे स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला आहे त्या वेळी सुद्धा सोवेली व तेरडी मधिल महिलांनी खुप सहकार्य केले होते याचे उदाहरण म्हणजे आजची महिलांची उपस्थिती आहे
या महिलांना एकत्र आणण्या साठी बचत गटाच्या सि आर पी सौ.प्राप्ती प्रसाद दळवी यांनी मेहनत घेतली म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत असे मत तांबे यानी व्यक्त केले या वेळी ग्रामविकास अधिकारी सौ.मर्चंडे मॅडम यानी उपस्थित मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व जिल्हा परिषद केंद्रीय शाळा सोवेली चे मुख्याध्यापक श्री .अबगुल सर यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमास ग्रामपंचायत चे मा.सदस्य व मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.संदिप दळवी ( ग्रामपंचायत शिपाई ) यांनी खुप मेहनत घेतली .
















