श्री देवी वरातीचा आज पासून शारदीय नवरात्री उत्सव सुरू…

 

🔴 श्री देवी वरातीचा आज पासून शारदीय नवरात्री उत्सव सुरू..

 

🌸 २२ ते २७ सप्टेंबर दरम्यान धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

 

गुहागर : तालुक्यातील खालचापाट येथील भाविकांचे श्रद्धास्थान, संकटमोचक श्री देवी वरातीच्या शारदीय नवरात्री उत्सवाला उद्यापासून (२२ सप्टेंबर) सुरुवात होत आहे. २७ सप्टेंबरपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ, गुहागर-खालचापाट उत्साहाने तयारी करत आहे.

 

दररोज सकाळी देवीची पूजा, संध्याकाळी आरती, त्यानंतर भजन, जाखडी नृत्य तसेच देवीचा महाप्रसाद असे भक्तिमय कार्यक्रम पार पडणार आहेत. या नवरात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

📌 हॅशटॅग्स :

 

#गुहागर #श्रीदेवीवराती #नवरात्री२०२५ #रत्नागिरीवार्ताहर #देवस्थान #भक्ती

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें