गुंतवणूकदारांची फसवणूक अखेर उघडकीस! TWJ संचालक यांच्यावर गुन्हा दाखल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🔴 गुंतवणूकदारांची फसवणूक अखेर उघडकीस!

TWJ संचालक  यांच्यावर गुन्हा दाखल

यवतमाळ :

शेअर बाजार गुंतवणुकीतून हमखास परताव्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या TWJ Pvt. Ltd. कंपनीवर अखेर यवतमाळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या FIR क्र. 1306/2025 अंतर्गत कंपनीचे संचालक समीर नार्वेकर व शाखा व्यवस्थापकाविरोधात भा.न्या.सं. 2023 चे कलम 316(2), 318(4), 3(5) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण कायदा 1999 चे कलम 4 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

२०१९ पासून TWJ कंपनीने गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करून आकर्षक परताव्याचे आश्वासन दिले. मात्र, गेल्या ८ महिन्यांपासून ना परतावा मिळाला ना मूळ रक्कम. याबाबत सिंगापूरमधून पैसे येणार असल्याचे सांगत संचालक समीर नार्वेकर गुंतवणूकदारांना खोट्या आशेवर ठेवत होता. अनेक वेळा तारखा देऊनही रक्कम परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांचा संयम सुटला आणि तक्रार दाखल करण्यात आली.

या गुंतवणुकीत अनेक उच्चपदस्थ अधिकारी व तब्बल २३०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी सामील असल्याचे समीर नार्वेकरनेच वारंवार सांगितले होते. कदाचित त्यामुळेच राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला. रत्नागिरीत चिपळूण व शहर पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी प्राथमिक चौकशीसुद्धा झाली नव्हती.

राज्यात TWJ च्या १६ शाखा असून सर्व संचालक, ब्रांच मॅनेजर व बिझनेस पार्टनर्स यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

📌 हॅशटॅग्स

#TWJScam #YavatmalPolice #InvestmentFraud #समीरनार्वेकर #शेअरबाजारफसवणूक #MaharashtraNews #Ratnagiri

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड   देऊळगाव राजा : भारत सरकार नोंदणीकृत...
Read More
ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड
Play sound