स्वामी गगनगिरी महाराजांच्या निसर्गरम्य मनोरी आश्रमात दर्शन सोहळा व लक्ष लक्ष दीप महोत्सवाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वामी गगनगिरी महाराजांच्या निसर्गरम्य मनोरी आश्रमात दर्शन सोहळा व लक्ष लक्ष दीप महोत्सवाचे आयोजन

नवीमुंबई (मंगेश जाधव)
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्वगौरवविभूषित योगीराज श्रीनाथ गगनगिरी महाराज यांच्या प्रेरणा आशीर्वादाने स्थापन झालेल्या श्री क्षेत्र मनोरी आश्रम स्थानी महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह व अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी व विश्वशांतीसाठी आयोजित केलेला लक्षदीप सोहळा हा कार्यक्रम मुंबई जवळील मालाड उपनगरापाशी असलेल्या नितांतसुंदर अश्या मनोरी येथील प्रसिद्ध गगनगिरी आश्रमात संपन्न होणार आहे

या धार्मिक सोहळ्यास दसरा दिनी म्हणजेच गुरुवार दिनांक २ ऑक्टो. पासून स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळ्यास प्रारंभ होणार असून या सोहळ्याची बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे.

याप्रसंगी मनोरी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या आई कर्जाई देवी मंदिर पासून ते आश्रम स्थानापर्यंत महाराजांचे मूर्तीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे व या सोहळ्यास प्रारंभ होणार असून दर्शन सोहळा सप्ताहास सुरुवात होईल.यावेळी श्री.सत्यनारायण महापूजा संपन्न होईल.

सदर धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने दररोज काकड आरती, हरिपाठ, पारायण ,होमहवन भंडारा आदी कार्यक्रम होणार असून त्यानतंर महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सप्ताहात अनेक मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने,प्रवचने, कथा निरूपण आदी कार्यक्रम संपन्न होणार असून या प्रसंगी जागर गोंधळ,नवचंडी याग, तसेच 56 भोग नैवेद्य अर्पण सोहळा संपन्न होणार आहे.

या उत्सवाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध शाहीर रूपचंद चव्हाण यांचे शाहिरी व भक्ती गीते कार्यक्रम सादर होणार असून कल्याण येथील दीपक रूमडे यांचे बहुउद्देशीय संस्थेचे वतीने” श्री गुरु सप्तशती चे सामुदायिक पारायण करण्यात येणार आहे.तसेच ह. भ. प. सौ उमा तेंडोलकर यांचे काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

या उत्सवाचे या प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्वामी गगनगिरी महाराजांनी आपल्या हयातीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने सुरू केलेला भव्य दिव्य लक्ष-लक्ष दीपसोहळा महोत्सव.यंदाचे हे २५ वे वर्ष असून या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने भाविक भक्तांमध्ये प्रचंड उत्साह व आनंदी वातावरण असून आजही महाराजांच्या कृपाशिर्वादाने हा लक्ष लक्ष दीप महोत्सव अव्याहत सुरू असून यावेळेस सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता,हजारो मुंबई करांचे वैभवशाली उपस्थितीत तसेच विविध आश्रमातील संत-साधू-भक्तमंडळींचे चैतन्यदायी उपस्थितीत सदर लक्ष- लक्ष दीप महोत्सव संपन्न होणार आहे.

सदरहू दर्शन-सोहळा कार्यक्रमास तसेच चैतन्यदायी लक्ष-लक्ष दीप महोत्सवात जास्तीत जास्त भाविक-भक्तांनी आवर्जून उपस्थित राहून दर्शन-आशिर्वादाचा लाभ घ्यावा,व सहकार्य करावे,असे आवाहन मनोरीआश्रम चे प्रमुख निषादजी पाटणकर यांनी केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला