आबलोली येथे मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप शिबिरास प्रारंभ

आबलोली येथे मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप शिबिरास प्रारंभ

आबलोली(संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख प्रमोदजी सिताराम गांधी यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त पडवे जिल्हा परिषद यांच्यावतीने रक्तदान शिबिर नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप शिबिराला उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे.

हे शिबीर यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष सचिन गडदे, आबलोली शहराध्यक्ष सुमित पवार, सोशल मीडिया अध्यक्ष प्रीतम सुर्वे यांचे सह तवसाळचे शाखाध्यक्ष निखिल गडदे, दीपक सुर्वे आदी. कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत. रक्तदान शिबिरासाठी भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावकर रुग्णालय डेरवण यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटरच्या डॉ. सुनिता झुंबरवाड, रवी अग्रवाल,नम्रता आयरे, विदयेश जांगळी, सचिन रानिम, धनश्री चव्हाण, सिद्धू लाड यांची टीम मेहनत घेत आहे. नेत्र तपासणीसाठी सुरेंद्र ऑप्टिक्स माहीम, मुंबई टीमच्या वतीने डॉ.सुरेंद्र निकम, डॉ. दर्शना जाधव, डॉ. गौरव निकम, निर्मला माडीये, सचिन निकम अजय डिंगणकर यांची टीम मेहनत घेत आहे.

या शिबिराला आबलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढवले. या शिबिराला जिल्हा परिषद पडवे गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें