सांताक्रूझमध्ये पारंपरिक जाकडी नृत्यकलेची रंगत – नवयुवक नवरात्रौत्सव मंडळात तिसरी वाडीच्या कलावंतांचा जल्लोष!

 


🟢 सांताक्रूझमध्ये पारंपरिक जाकडी नृत्यकलेची रंगत – नवयुवक नवरात्रौत्सव मंडळात तिसरी वाडीच्या कलावंतांचा जल्लोष!

कोकणची संस्कृती मुंबईत खुलली; विसापूर तिसरी वाडीच्या शिवकृपा हौशी कला मंडळाने प्रेक्षकांची मने जिंकली

मुंबई (प्रतिनिधी) –
सांताक्रूझ (पूर्व) न्यु आग्रीपाडा येथील नवयुवक नवरात्रौत्सव मंडळ यंदा 51 व्या वर्षात पदार्पण करत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढवली. दरवर्षी अनेक उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाने यंदा कार्यकर्त्यांच्या दीर्घकालीन मागणीप्रमाणे कोकणातील पारंपरिक जाकडी नृत्यकला मुंबईकरांसाठी खुली करून दाखवली.

मंडळाचे अध्यक्ष गोविंद भोईर, सेक्रेटरी गणेश कांबळे, खजिनदार सुधाकर भोईर व सर्व महिला-मंडळाच्या पुढाकाराने गुहागर तालुक्यातील विसापूर गावातील शिवकृपा हौशी कला मंडळ, तिसरी वाडी यांना खास निमंत्रित करण्यात आले.

२४ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमासाठी विरार ते सांताक्रूझ असा लांबचा प्रवास करून लहानगे, महिला व पुरुष कलाकार बहुसंख्येने दाखल झाले. ढोलकीच्या पारंपरिक तालावर रंगलेल्या जाकडी नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. ठिकठिकाणी बक्षिसांचा वर्षाव झाला आणि नवरात्र उत्सव आनंद-उत्साहाने उजळून निघाला.

तिसरी वाडीतील कलाकारांनी आपल्या परंपरेला न्याय देत “पूर्वजांची पुण्याई, ईश्वराची कृपा आणि ग्रामदेवतेचा आशीर्वाद” या विश्वासाने नृत्यकला सादर केली. त्यांच्या या सादरीकरणाने गावाचं आणि वाडीचं नाव रोशन करत कोकणच्या सांस्कृतिक वारशाची झलक मुंबईकरांना अनुभवता आली.


📌 हॅशटॅग्स :

#नवरात्रोत्सव #जाकडीनृत्य #सांताक्रूझ #कोकणसंस्कृती #गुहागर #तिसरीवाडी #नवयुवकमंडळ

📸 फोट

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें