किल्ले धर्मवीरगडचे राजेशिर्के घराण्याचे वंशज माजी सरपंच देविदास काका राजेशिर्के अनंतात विलीन ;

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

किल्ले धर्मवीरगडचे राजेशिर्के घराण्याचे वंशज माजी सरपंच देविदास काका राजेशिर्के अनंतात विलीन ;

समाजसेवी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड ;

अहिल्यानगर (नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधी) : अ.नगर जिल्ह्यातील मौजे पेडगांव ता. श्रीगोंदा, ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) येथील महाराणी येसुबाई साहेब तथा राजेशिर्के घराण्याचे वंशज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर “जिल्हा उपाध्यक्ष” व पेडगाव किल्ले धर्मवीरगडचे माजी सरपंच पैलवान मा.श्री. देविदास (काका) गणपतराव राजे शिर्के (वय- ४४ वर्षे ) यांचे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी वाडिया हॉस्पिटल पुणे येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले असून असंख्य लहान थोरांच्या मना-मनात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण झालेले नेतृत्व तसेच समाजसेवी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने व राजेशिर्के घराण्याला जे दुःख झाले, त्यामुळे संपूर्ण गावासह तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे*

*सरपंच देविदास काका राजेशिर्के यांनी अगदी कमी वयात आपले वडील स्वर्गवासी चेअरमन पैलवान गणपतराव राजेशिर्के यांच्या पावलावर पाऊल टाकत सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रवेश करून समाजसेवा करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी श्रीगोंदा मार्केट कमेटी, ग्रामपंचायत, शेतकरी सोसायटी आदि अनेक निवडणुका लढविल्या होत्या तर गावातील किल्ले धर्मवीरगड संवर्धन कार्यासह मंदिरे बांधण्या बरोबरच धार्मिक ,सामाजिक कार्यासाठी देणगी देण्यासाठी ते कायम पुढे असत तसेच गोर गरीबांसह गरजवंताला आर्थिक मदत देणे, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात ही ते नेहमी अग्रस्थानी असत, पैलवान असल्याने त्यांनी कुस्ती क्षेत्रात नावलौकीक मिळवला होता. क्रिकेटमध्ये ही ते अष्टपैलू खेळाड होते. अशा विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात भरीव कार्य केल्याने ते विरोधकांच्या ही मनावर राज्य करणारे व्यक्तिमत्व ठरले होते.*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश नेते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के, इतिहास अभ्यासक व पत्रकार लक्ष्मीकांत राजे शिर्के, सतिश राजेशिर्के यांचे ते धाकले बंधु होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, मुलगा यशराज राजेशिर्के, भावजया, चुलते, पुतणे, चुलत बंधु, चुलत भावजया आदि मोठा राजेशिर्के परिवार आहे. राजेशिर्के परिवाराच्या दुःखात सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी सांत्वरपर भेट देऊन धीर देत सांत्वन केले आहे. दशक्रिया विधी १ ऑक्टोबर २०२५ रोजी वार बुधवार सकाळी ८ : ०० वाजता श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे भीमा नदी तीरावर होईल. दशक्रिया विधी निमित्त ह.भ.प. विजयाताई पंडित यांचे प्रवचन होईल.*

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात