🌳 ३ लाख १४ हजार रुपयांच्या सागाची चोरी; सात जण अटकेत!
क्रेनच्या सहाय्याने रातोरात झाडे पाडून लाकूड ट्रकमध्ये; वन विभागाची धडक कारवाई
रत्नागिरी –
लांजा तालुक्यातील कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रातून सागवानाच्या झाडांची मोठी चोरी उघडकीस आली आहे. वन विभागाने केलेल्या कारवाईत ३ लाख १४ हजार ७९० रुपयांचा सागवान मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
दि. ३० ऑगस्ट रोजी वनपाल व वनरक्षकांच्या गस्तीदरम्यान सात साग झाडांची अवैध तोड झाल्याचे निदर्शनास आले होते. तपासात आरोपींनी क्रेनच्या सहाय्याने झाडे पाडून ट्रकमधून कुर्णेहून कुंभवडे येथे वाहतूक केली व नंतर माडबन पठारभागात लाकूड लपवून ठेवल्याचे समोर आले.
अटक आरोपींची नावे अशी आहेत –
मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रुघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर आणि शुभम रवींद्र गुरव (सर्व रा. कुंभवडे).
आरोपी मनोज पाटणकर याच्या कबुलीजबाबानंतर ही माहिती समोर आली. वन विभागाने एकूण ३१ साग झाडे (७.४९५ घ.मी.) जप्त केली असून, बाजारभावानुसार किंमत ३ लाख १४ हजार ७९० रुपये इतकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली क्रेन (एमएच ०९ जीएम ०४५२) देखील जप्त करण्यात आली आहे. इतर वाहनांबाबत तपास सुरू आहे.
—
📌 हॅशटॅग्स:
#रत्नागिरी #लांजा #सागवानचोरी #वनविभाग #गुन्हा #रत्नागिरीवार्ताहर















