भगवान चिपळूणकर लोटे अपघात प्रकरणी दोषी वाहन चालकावर व गाडी मालकावर RTO विभागामार्फत कारवाई करण्याचे आदेश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भगवान चिपळूणकर लोटे अपघात प्रकरणी दोषी वाहन चालकावर व गाडी मालकावर RTO विभागामार्फत कारवाई करण्याचे आदेश

👉 वडिलांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी मुलगा वैभव चिपळूणकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न

RTO,रत्नागिरी विभागाकडून स्कॉड पथकाद्वारे वाहनावर कारवाईचे आदेश

चिपळूण (वार्ताहर):-चिपळूण – लोटे येथे माझे वडील भगवान सखाराम चिपळूणकर रा.कोलेखाजन,चिपळूण हे दि.०६/०५/२०२४ रोजी नेहमीप्रमाणे लोटे बाजार येथे मच्छी व्यवसाय करण्यासाठी मोटार सायकल नंबर-MH08/X/3217 घेवून सुकी मच्छी विकणेकरिता दुपारी- ४.००वाजता आठवडा बाजार आवाशी,लोटे ता.खेड येथे गेलो होते. तेथे सुकी मच्छी विक्री करून ते रात्री ९.४५ वाजता परत मोटार सायकलने चिपळूणकडे येण्यास निघाले. हॉटेल विरंगुळा या ठिकाणी आले असता रॉंग साईडने आलेल्या डब्बल केबिन बोलेरो गाडी (MH08TC 827) (MHO8 AP7436) या गाडीने ठोकर दिली. त्यात गंभीर जखमी झाले.रॉंग साईडने आलेल्या डब्बल केबिन बोलेरो गाडी (MH08TC 827) *चालक कु.सुमित शेटप्पा पवार वय-१९ वर्षे याने अपघात करून त्या ठिकाणावरून पलायन केले.व गाडीचालक यांचा परवाना हा ट्रान्सपोर्ट नसून नॉन ट्रान्सपोर्ट असा होता. सदर अपघातग्रस्त गाडी ही श्री.दिनेश संपत पवार , खांदाटपाली यांच्या मालकीची असल्याने* सदर दोन्ही व्यक्तीची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. माझे वडील रक्ताच्या थारोळ्यात व्हिवळत तिथेच पडून राहिले.प्रत्यक्षदर्शी साक्षीदार श्री.प्रबोध प्रभाकर बापट रा.खडपोली(तळेवाडी) ता.चिपळूण यांनी पोलीस कॉन्स्टेबल उदय संभाजी भोसले लोटे पोलीस दुरक्षेत्र,खेड यांना सविस्तर घटना सांगितली.व सदर चालकावर गुन्हा रजि.क्र १६७/२०२४ असा दाखल करण्यात आला आहे.
त्यावेळी सदर घटनेचा पोलिसांकडून तपास करण्यात आला. पंचनामा करतेवेळी खेड पोलिस स्टेशन मधील सहा.पोलिस निरीक्षक श्री.संजय पाटील यांनी सदर गाडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे दिली नाही.असे लेखी पत्र दि.०७/०७/२०२५ रोजी कार्यालयाकडून प्राप्त झाले.ही कायद्याने हीअतिशय गंभीर बाब आहे.
यावर तक्रारदार श्री.वैभव भगवान चिपळूणकर कोलेखाजन,चिपळूण यांनी वारंवार पोलिस विभाग व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
त्यावर आज तब्बल एक वर्ष पूर्ण होत असताना कार्यालयीन आदेश क्रमांक – २८३/२०२५ दि.०९/०९/२०२५ रोजीचे पत्रक काढण्यात आले.व कारवाईचे आदेश RTO,रत्नागिरी विभागाकडून करण्यात आले आहेत.
*धक्कादायक बाब अशी की, तक्रारदार श्री.वैभव चिपळूणकर यांनी सहा महिन्यांनी चौकशी कायदेशीर करीत असताना सदर आरोपीस पत्रव्यवहार करण्यात आला.तोपर्यंत कोणतीही कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आली नाही.*.खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि.१६७/२०२४ भा.द.विस.कलम- ३०४(अ),२७९,३३७,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ (अ) (ब) या पुण्यातील दोषी वाहन MH- 08AP7436 या वाहनावर कारवाई होण्यावर आदेशित करण्यात आले.
त्या अनुषंगाने वाहन तपासणी दरम्यान सदर मोटर वाहन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी व तसा अहवाल उपप्रादेशिक परिवहन रत्नागिरी विभागाकडे सादर करावा असे आदेश करण्यात आले.
व सदर कारवाई करण्यासाठी स्कॉट पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश करण्यात आले आहेत.याबाबत सातत्याने तक्रारदार वैभव चिपळूणकर करणार आहेत.
*सदर गाडी चालक व गाडीमालक याच्यावर कोणती कारवाई होते. याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे*.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला