सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे महर्षि वाल्मिकी जयंती साजरी

 

🟠 सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे महर्षि वाल्मिकी जयंती साजरी

संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण; वाल्मिकींच्या कार्यावर मार्गदर्शन

डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार; वाल्मिकींच्या कार्यावर मार्गदर्श

 

रत्नागिरी – डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ येथे दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी तिथीनुसार (आश्विन पौर्णिमा) महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

कार्यक्रमाची सुरुवात संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व उपस्थितांकडून अभिवादनाने झाली. यावेळी केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

या प्रसंगी डॉ. केतन चौधरी यांनी महर्षि वाल्मिकी यांचे जीवन, कार्य व योगदान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाल्या कोळी कसा आद्यकवि महर्षि वाल्मिकी झाला आणि त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना करून भारतीय संस्कृतीला अमूल्य असे योगदान दिले, याचा उल्लेख त्यांनी केला.

 

 


 

✅ हॅशटॅग्स:

#रत्नागिरी #महर्षिवाल्मिकीजयंती #झाडगाव #सागरीसंशोधनकेंद्र #DBSKKV #Ramayan #ValmikiJayanti #KonkanNews #CulturalEvent #MaharashtraNews

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें