कफ सिरप घोटाळ्यात १७ मुलांच्या मृत्यूनंतर अखेर श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन अटकेत!

 

📰 कफ सिरप घोटाळ्यात १७ मुलांच्या मृत्यूनंतर अखेर श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन अटकेत!

💊 ‘कोल्ड्रिफ’ या विषारी कफ सिरपमुळे निष्पाप बालमृत्यू; SIT ची मोठी कारवाई

 

भोपाळ / चेन्नई (प्रतिनिधी):

मध्यप्रदेशात ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपमुळे १७ हून अधिक निष्पाप मुलांचे मृत्यू झाल्यानंतर अखेर श्रीसन फार्मास्युटिकल्सचे मालक रंगनाथन गोविंदन यांना पोलिसांनी अटक केली आहे.

एमपी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) तामिळनाडूतील चेन्नई येथे धडक कारवाई करत त्यांना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी आधीच त्यांच्यावर २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

रंगनाथन गोविंदन यांनी कांचीपुरममधील घर आणि कारखाना बंद करून पत्नीसमवेत फरार झाले होते. अनेक आठवड्यांच्या शोधानंतर SIT ने इलेक्ट्रॉनिक पाळत आणि स्थानिक माहितीच्या आधारे त्यांचा ठावठिकाणा शोधला. अटक झाल्यानंतर त्यांना भोपाळला आणले जात असून, कफ सिरप उत्पादनातील अनियमितता, कच्चा माल पुरवठा आणि परवाना प्रक्रियेतील त्रुटींबाबत चौकशी केली जाणार आहे.

 

५ ऑक्टोबर रोजी छिंदवाडा येथील पारसिया पोलिस ठाण्यात श्रीसन फार्माचे संचालक, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण सोनी आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध आयपीसी कलम १०५, २७६ तसेच ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा १९४० च्या कलम २७अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. प्रवीण सोनी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

 

कोल्ड्रिफ सिरपचे सेवन केल्यानंतर मध्यप्रदेशात २० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याने राज्यभर संतापाची लाट पसरली. आरोग्य विभागाने तत्काळ या औषधाच्या विक्रीवर बंदी घातली असून औषध सुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

 

🔖 #कफसिरपघोटाळा #ShreeSunPharma #RanganathanGovindan #ColdRifSyrup #MadhyaPradeshNews #HealthScam #DrugSafety #RatnagiriVartahar

 

🖼️

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें