चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोलीच्या विद्यार्थीनी कु. पूजा अरुण आंब्रे, कु. समृद्धी सुधाकर भोजने कराटे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोलीच्या विद्यार्थीनी कु. पूजा अरुण आंब्रे, कु. समृद्धी सुधाकर भोजने कराटे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

आबलोली (संदेश कदम)
रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. पूजा अरुण आंब्रे हिने 14 वर्षाखालील वयोगटात व कु. समृद्धी सुधाकर भोजने हिने 17 वर्षाखालील वयोगटात या दोन्हींही विधार्थीनींनी शालेय स्तरावरील कराटे स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. पूजा अरुण आंब्रे व कु. समृद्धी सुधाकर भोजने यांची जिल्हास्तरावर स्पर्धा होऊन आता विभाग स्तरावर स्पर्धा होईल व राज्यस्तरावर स्पर्धेसाठी त्या पात्र होतील. या दोन्हीही विद्यार्थिनींचे प्राध्यापक डी.डी. गिरी, लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत, चंद्रकला फाउंडेशनच्या सचिव सौ. स्नेहल बाईत यांचेसह गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक संघटना यांच्यावतीने या विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें