पडवे ~ वेळणेश्वर जि.प. निवडणुका लक्षवेधी ठरणार! शिंदे सेनेतून महेश नाटेकर आणि नेत्रा ठाकूर रिंगणात?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

📰 पडवे ~ वेळणेश्वर जि.प. निवडणुका लक्षवेधी ठरणार! 🏹 शिंदे सेनेतून 🚩महेश नाटेकर आणि नेत्रा ठाकूर रिंगणात?

 

शिवसेना (ठाकरे गट) ला गुहागरमध्ये तगडे आव्हान; आमदार भास्कर जाधव यांच्यासाठी परीक्षा ठरणार निवडणूक

 

गुहागर (सुजित सुर्वे, पडवे ):

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून गुहागर तालुक्यातील पडवे आणि वेळणेश्वर हे जिल्हा परिषद गट विशेष लक्षवेधी ठरणार आहेत.

या दोन्ही गटांमधून शिवसेना (शिंदे सेनेच्या) उमेदवार म्हणून महेश नाटेकर आणि सौ. नेत्रा ठाकूर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील हे गट असल्याने या निवडणुका आता प्रतिष्ठेचा प्रश्न बनल्या आहेत. विशेष म्हणजे, सौ. नेत्रा ठाकूर यांची राजकीय कारकिर्द आमदार जाधव यांच्या सहकार्याने फुलली होती; मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनीच आपल्या कार्यकर्त व समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला.

त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्याने  गुहागरमधील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. तर अनेक राजकीय समीक्षक ही अचंबित झाले होते.

दरम्यान, महेश नाटेकर यांनी पूर्वी शिवसेना (ठाकरे गट) तर्फे जिल्हा परिषदेत निवडून येत उपाध्यक्षपद भूषवले होते. त्यांनीही शिवसेना ~ शिंदे गटात प्रवेशानंतर  ते आपल्या सहकार्यासह  गेल्या महिनाभरात मतदारसंघात गाठीभेटी  घेत आहेत .

गद्दारी मोडून टाकण्याचे आदेश…

या दोन समर्थक नेत्यांनी पक्ष सोडल्यावर आमदार भास्कर जाधव यांनी हेदवी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन या दोन्ही गटात बंडखोर उमेदवारांविरोधात पक्षाचे उमेदवार उतरवण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यांना निवडून आणून गद्दारी चां बदला घ्या असे आवाहन केले होते.

स्वबळ की युती, आघाडी..

दरम्यान, अद्याप महाविकास आघाडी, महायुती किंवा स्वबळावर लढणे याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसे अनेक राजकीय समीकरणे बदलतील, अशी चर्चा सुरू आहे.

स्थानिक पातळीवर यांचा अजूनही प्रभाव…

राजकीय  सूत्रांनुसार, स्थानिक जनमत मात्र सध्या सौ. नेत्रा ठाकूर आणि महेश नाटेकर यांच्या बाजूने झुकलेले दिसत आहे. दोघांकडे प्रचार करण्यासाठी चांगली टीमवर्क असल्याचं बोलल जात आहे. तर दोघांचं ही व्यक्ती गत संबंध ही लोकांशी आहेत असं ही तेथील मतदार सांगत आहेत.

आमदार जाधव नवख्या उमेदवाराला संधी देणार…

मात्र आमदार भास्करराव यावेळी या निवडणुकीत यांच्या विरोधात तुल्यबळ कोण उमेदवार देणार की धक्का तंत देऊन वेगळा चेहरा रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू आहे

 

 

🔖 हॅशटॅग्स:

 

#गुहागर #रत्नागिरीराजकारण #शिंदेसेना #भास्करजाधव #महेशनाटेकर #नेत्राठाकूर #जिल्हापरिषदनिवडणूक #KonkanPolitics #RatnagiriVarta

 

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]