वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके भेट

वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके भेट

दापोली– वाचन प्रेरणा दिनानिमित्त दापोली येथील हरी केशव गोखले मोफत वाचनालयाच्या वतीने दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथील सर्व विद्यार्थ्यांना साधना मासिकाचे बालकुमार दिवाळी विशेषांक भेट देण्यात आले. ग्रंथालयाच्या वतीने चंद्रनगर शाळेतील आयोजित कार्यक्रमात ग्रंथालयाचे पदाधिकारी असलेल्या मिलिंद जोशी, मधुरा जोशी, किशोरी भांबीड, सुनील रांगले यांनी चंद्रनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या पुस्तकांचे वाटप केले.
चंद्रनगर शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना हरी केशव गोखले मोफत वाचनालयाच्या मिलिंद जोशी यांनी चंद्रनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या शाळेतील सर्व विद्यार्थी नियमितपणे ग्रंथालयातील पुस्तके वाचत असल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वाचनाची आवड बघून त्यांनी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी वाचनविषयक अभिनव स्पर्धेची स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गोखले वाचनालयाकडून आकर्षक बक्षीसांचीही घोषणा केली. यावेळी चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, मानसी सावंत, मधुरा जोशी, रेखा ढमके यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें