कर्जाचे कारण नसेले तरी चालेल पण तारण असले पाहिजे – चेअरमन प्रकाश मांडवकर
आबलोली (संदेश कदम )
अर्जदार हा व्यवसायिक असला पाहिजे. त्याची रोजची कमाई किती होते.यावर कर्ज किती द्यायचे हे ठरवता येते. तसेच जामीनदार हे आर्थिक सक्षम असले पाहिजेत. कर्जदाराचे कर्ज किती? थकीत किती? वसुली वेळच्या वेळेला झाली पाहिजे,वसुली वेळेत झाली नाही तर कर्ज बुडीत गेल्यावर संचालक अडचणीत येऊ शकतात.
कर्जदाराचा फॉर्म भरताना त्यावर कर्जाचे कारण नसले तरी चालेल पण त्या कर्जासाठी तारण हे असले पाहिजे असे स्पष्ट मत राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित. राजापूर या सहकारी पतपेढीचे चेअरमन प्रकाश मांडवकर यांनी बोलताना स्पष्ट केले.
राजापूर तालुक्यातील, राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित राजापूर या पतपेढीत गुहागर तालुक्यातून गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेच्या आबलोली, हेदवी, शृंगारतळी या तिन्हीं शाखेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कर्मचारी अभ्यास दौऱ्यासाठी आले होते. यावेळी राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे चेअरमन प्रकाश मांडवकर मार्गदर्शन करीत होते.
यावेळी अभ्यास दौऱ्यात मार्गदर्शन करताना चेअमन प्रकाश मांडवकर पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रात प्रचंड अडचणी येतात. सहकाराचे रोपटे वाढवायला कठोर राहावे लागते. यासाठी कर्मचाऱ्यांनी हे योगदान दिले पाहिजे.वसुलीही केलीच पाहिजे. कुणबी पतसंस्थेने 16 कोटी सोने तारण व्यवहार केलेला आहे. टार्गेट पूर्ण केलेच पाहिजे. कर्मचारी कामात ध्येय्य वेडा असला पाहिजे, टीम वर्क करा. पाच लाख ठेवी, पाच लाख कर्ज असे आणायचेच वर्षाला एक कोटी वीस लाख हा व्यवसाय झालाच पाहिजे. सहकार क्षेत्राला ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहे त्या त्या गोष्टी पूर्ण करा. यामध्ये गोल्ड व्यवहार झाला पाहिजे. ब्रँडेड तिजोरी असली पाहिजे, सॉफ्टवेअर चांगल्या क्वालिटीचे असावेत, शेअर्स वाढ झालीच पाहिजे. तरच तुमच्या जीवनातला आनंद मला बघायला मिळेल असा विश्वासह चेअरमन प्रकाश मांडवकर यांनी व्यक्त केला.यावेळी राजापूर कुणबी सहकारी पतपेढीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, वसुली अधिकारी श्रीकांत राघव यांनीही मौलिक मार्गदर्शन करून गुहागर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कर्मचारी समाधान होईल असे शंकांचे ही निरसन केले.
यावेळी गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेच्या तिन्हीं शाखांचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी,माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, जेष्ठ संचालक पांडुरंग पाते, तज्ञ संचालक अनंत पागडे, संचालक महादेव वणे, संचालिका श्रीमती वनिता डिंगणकर, संचालक वैभव आदवडे, संदेश कदम, कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर, कर्मचारी संजय आग्रे, संतोष हुमणे, वैभव बागवे, सुशील फडकले, माजी शिक्षण सभापती दीपक नागले,सौ. अमृता शिवगण, गुणाजी शिवगण,प्रकाश कुवळेकर, आदी. उपस्थित होते.















