शिरूर: बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू; जाबूतमध्ये संतप्त ग्रामस्थांचे ‘रास्ता रोको’, बंदोबस्ताची मागणी

: शिरूर: बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू; जाबूतमध्ये संतप्त ग्रामस्थांचे ‘रास्ता रोको’, बंदोबस्ताची मागणी

सविस्तर बातमी:

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जाबूत येथे बुधवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव (वय-७०) या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. थोरात वस्ती परिसरात शेतात असलेल्या आपल्या घराबाहेर पहाटेच्या वेळी प्रात:र्विधीसाठी गेलेल्या भागूबाई जाधव यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला.

हल्ला इतका अचानक होता की, त्यांना किंचाळायलाही वेळ मिळाला नाही. काही वेळाने घरातील सदस्यांना घराबाहेर चप्पल दिसल्याने त्यांनी शोध सुरू केला. बिबट्याने त्यांना ओढत अर्धा किलोमीटर अंतरावरील उसाच्या शेतात नेऊन ठार मारले होते.

या हृदयद्रावक घटनेनंतर जाबूतसह परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बिबट्याच्या वाढत्या मानवी वस्तीतील वावरामुळे व हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संतप्त ग्रामस्थांनी बेल्हे-जेजुरी रस्त्यावर पंचतळे येथे रास्ता रोको आंदोलन केले. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

प्रशासनाने या भागात बिबट्या पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावून वन विभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत दिली जाईल ,यावेळी पोलिस अधीक्षक संदीप गिल,अतिरिक्त जिल्हाधिकारी राऊत,वन संरक्षक प्रशांत खाडे,स्मिता राजहंस सह अधिकारी उपस्थित होते .

 


#LeopardAttack #Shirur #Jambut #BibtyachaHalla #RastaRoko #पुणे #शिरूर #बिबट्या #वनविभाग

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें