गुहागर तालुक्यामधील पालपेणे येथे सोललेल्या खैराची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या गाडीवरती वनविभागाची कारवाई
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील मौजे कुंभारवाडी तर्फे पालपेणे येथे सोललेल्या खैराची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या गाडीवरती वन विभागाची कारवाई झाली आहे. मौजे कुंभारवाडी तर्फे पालपेणे येथे गेले कित्येक दिवस खैर चोरीच्या अनेक तक्रारी होत होत्या. मात्र कोणताही सबळ पुरावा नसल्याने याकडे दुर्लक्ष केलं जात होत .. मात्र काल पालपेणे येथे रस्त्याच्या कडेला एका बोलेरो गाडीमध्ये खैराचे लाकूड भरताना स्थानिकांच्या निदर्शनास आलं त्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाचे अधिकारी अमित निमकर यांनी तत्काळ जागेवर येऊन त्या गाडीवर कारवाई केली
या कारवाई मध्ये पालपेणे येथील सोन्या पालकर यांच्या जमिनीतील (अज्ञात इसमाने तोडलेले) एक लाख रुपये किमतीचे खैराचे लाकूड तसेच चिपळूण तालुक्यातील उभळे गावातील विराज चव्हाण यांच्या नावे असलेली पाच लाख रुपये किमतीची बोलेरो गाडी वन विभागाने जप्त केली आहे ..
या कारवाईमुळे गुहागर तालुक्यातील खैर चोरांचे धाबे दणाणले आहेत यात तीळ मात्र शंका नाही















