जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन : विनोदी अभिनयाचा अजरामर कलाकार हरपला
नवीमुंबई (मंगेश जाधव)
विनोदी आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेले जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे आज, शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मूत्रपिंडाच्या विकारांमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
‘इंद्रवदन साराभाई’ची ओळख अजरामर
‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेने सतीश शाह यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.
या मालिकेत त्यांनी साकारलेला ‘इंद्रवदन साराभाई’ हा मिश्किल, खोडकर आणि बुद्धिमान वडिलांचा रोल प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणार आहे.
रत्ना पाठक शाह यांच्यासोबतची त्यांची जुगलबंदी मालिकेचे खास आकर्षण ठरली होती.
अर्धशतकाहून अधिक कारकिर्द – २०० पेक्षा जास्त चित्रपट
सतीश शाह यांनी आपल्या ५० वर्षांहून अधिकच्या अभिनय प्रवासात २०० पेक्षा जास्त चित्रपट आणि अनेक मालिकांमध्ये काम केले.
त्यांच्या विनोदी भूमिकांनी भारतीय प्रेक्षकांना हसवले, विचार करायला लावले आणि अनेक पिढ्यांवर ठसा उमटवला.
काही गाजलेले चित्रपट व मालिका:
‘जाणे भी दो यारों’ (1983) – कमिश्नर डी’मेलो म्हणून लक्षवेधी भूमिका
‘ये जो है जिंदगी’ (1984) – ५५ भागांत ५५ वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या
‘मैं हूँ ना’ (2004) – प्रोफेसर देसाईची विनोदी भूमिका
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ – अजित सिंग म्हणून संस्मरणीय अभिनय
तसेच कल हो ना हो, फना, ओम शांती ओम, हम आपके हैं कौन, आणि कॉमेडी सर्कस (परीक्षक म्हणून)














