सामर्थ्य सेवा संस्थेच्या दिवाळी शिबिरातून मुलींमध्ये आत्मविश्वासाचा उजेड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सामर्थ्य सेवा संस्थेच्या दिवाळी शिबिरातून मुलींमध्ये आत्मविश्वासाचा उजेड

 ग्रामीण भागातील शिक्षण आणि संस्कारासाठी सामर्थ्य सेवा संस्था कार्यरत

 

आबलोली (संदेश कदम)

आजच्या युगात मुलींना स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि सद्‌विचारांची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशाने सामर्थ्य सेवा संस्था (रजि.) यांच्या वतीने आयोजित ‘दिवाळी सुट्टी एकत्रीकरण 2025’ या निवासी शिबिराचा सांगता समारंभ 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता निगुंडळ येथे उत्साहात पार पडला.

 

शिबिराची सुरुवात सहभागी मुलींच्या मनमोहक दीपनृत्याने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या शिबिरात एकूण 25 मुलींनी सहभाग घेतला होता. या काळात मुलींना योगाभ्यास, बौद्धिक विकास, पारंपरिक खेळ, रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा यांसह विविध उपक्रमांतून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

एकतेचा संदेश देणारी मुलींची नाटिका आणि नयन केंबळे, रीषभ मुकनाक, शुभम शिरकर, सार्थक शिरकर, निष्णात ताम्हणकर या छोट्या मुलांनी तयार केलेला मल्हारगड प्रतिकृती हे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. शिबिराचे मार्गदर्शन संस्थेच्या संस्थापक व सचिव सौ. प्रज्ञा ताम्हणकर यांनी केले. तर यामध्ये सहभागी विद्यार्थिनींना योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी योगा शिक्षक विश्वास शिर्के, सचिन येवले, तसेच विविध खेळांतून आपले बुद्धीकौशल्य विकसित करण्यासाठी अवधूत समगिस्कर यांनी विशेष मार्गदर्शन केले. सहभागी मुलींनी आपल्या वक्तृत्वातून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या मुलींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

 

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अरविंद धामणस्कर, सदस्या रंजना धामणस्कर, निगुंडळ गावच्या सरपंच दीप्ती गिजे, पोलिस पाटील प्रकाश आंबोकर, संतोष धामणस्कर गुरुजी, ग्रामस्थ व पालक संदीप केंबळे व सौ. केंबळे, वडद गावचे उपसरपंच संदीप धनावडे, मार्गताम्हाणे येथील योगा शिक्षक विश्वास शिर्के सर, शिष्य सचिन येवले, तळवली गावातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रदीप चव्हाण आणि उत्तम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

सामर्थ्य सेवा संस्था (रजिस्टर) ही ग्रामीण भागातील विशेषतः गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत सामाजिक संस्था आहे.

 

या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या माध्यमातून सक्षम, आत्मनिर्भर आणि मूल्याधिष्ठित नागरिक घडविणे.

 

संस्थेचे प्रमुख उपक्रम :

 

सर्वांगीण विकास निवासी शिबिरे – दिवाळी व उन्हाळी सुट्टीत मुलींसाठी निवासी शिबिरांचे आयोजन करून शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकास साधणे.

 

निवासी शैक्षणिक सुविधा – शिक्षणात मागे पडणाऱ्या मुलींना निवासी शिक्षणव्यवस्था उपलब्ध करून देणे.

 

गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन – आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक मदत पुरविणे.

 

प्रज्ञा ताम्हणकर आणि त्यांचे पती महेश ताम्हणकर यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेचे कार्य प्रभावीपणे पुढे जात आहे. उपस्थितांमधून संतोष धामणस्कर गुरुजी, प्रदीप चव्हाण आणि संदीप धनावडे यांनी मन:पूर्वक आभार मानून शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रेया गिजे हिने केले, प्रास्ताविक प्रज्ञा ताम्हणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी पायल धामणस्कर हिने केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी
Play sound