लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC साठी अंतिम तारीख जाहीर

लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC साठी अंतिम तारीख जाहीर

नवीमुंबई (मंगेश जाधव)
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या लोकप्रिय योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत आहे.

आतापर्यंत अनेक महिलांना मागील काही महिन्यांचे हप्ते मिळाले असून, आता सरकारने या योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सतत मिळवण्यासाठी लाभार्थींनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

महिला व बालविकास विभागाकडून यासाठी विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे. मात्र, ई-केवायसी करताना काही महिलांना ओटीपी संदर्भात तांत्रिक अडचणी येत असल्याची नोंद झाली आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि लाभार्थींना नियमितपणे आर्थिक मदत मिळण्यासाठी e-KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,”
असे त्यांनी स्पष्ट केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें