अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसानाचे त्वरित पंचनामे करा संघर्ष समितीचे तहसीलदारांकडे मागणी

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसानाचे त्वरित पंचनामे करा
संघर्ष समितीचे तहसीलदारांकडे मागणी

नवीमुंबई ( मंगेश जाधव)

मंडणगड
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापलेल्या शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पाण्यात भिजून गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत होणे गरजेचे असल्याने कृषी अधिकारी आणि महसूल अधिकारी यांनी तात्काळ शेताच्या बांधावरती जाऊन पाहणी करावी व शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा. याकरिता संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी मंडणगड नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी केली . यावेळी निवेदन देताना सदर समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे, उपाध्यक्ष अहमद बुरुड, सचिव भरत सरपरे, सहसचिव विश्वास सुगदरे, कार्याध्यक्ष संकेत तांबे, संघटक अभय पिचुर्ले, कायदेविषयक सल्लागार ऍड. विराज गमरे प्रसिद्धीप्रमुख मयुरेश धोत्रे, संघटक सचिन धोत्रे, खजिनदार सतीश जाधव, प्रवीण चोरगे, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें