६४ व्या महाराष्ट्र हाऊसिंग मराठी नाट्य स्पर्धेमध्ये श्री गणेश नाट्य मंडळाचे अकल्पित नाटक

गुहागर – ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ मध्ये सहभाग घेणं, हे श्री गणेश नाट्य मंडळाचं केवळ स्वप्न नव्हतं, तर समस्त गुहागर तालुक्यातील कलाकारांचे स्वप्न होत. आज ते पूर्ण करण्याचं आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत. तर हे गेली अनेक महिने घेतलेल्या अफाट मेहनतीचं आणि कलाप्रती असलेल्या निष्ठेचं फलित आहे.
तालुक्यात कलेचा वारसा पुढे नेण्याचं ध्येय मनात ठेवून, कलाकारांनी दिवस-रात्र एक करत, प्रत्येक संवादावर, अभिनयाच्या प्रत्येक बारीकसारीक तपशीलावर काम केलं आहे.
त्यांच्या याच निस्सीम प्रयत्नातून ‘अकल्पित’ हे २ अंकी नाटक तुमच्यासमोर सादर होत आहे.
गुहागर तालुक्यातून प्रथमच राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेसाठी आम्ही भाग घेत आहोत, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे!
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी, आणि आमच्या कलाकारांच्या मेहनतीला कौतुकाची थाप देण्यासाठी, तुम्ही नक्की या!
नाटक: अकल्पित (२ अंकी नाटक)
लेखक: हरीश सामंत,दिग्दर्शक: संदीप वणकर, स्थळ: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरीदिनांक: १० नोव्हेंबर २०२५वेळ: सायं 7 वा.
तुमची उपस्थिती आमच्यासाठी अमूल्य आहे.,असे आवाहन श्री गणेश नाट्य मंडळ वेलदुर नवानगर यांनी केले आहे. स्पर्धेसाठी अकल्पित नाटकाची निवड झाल्याबद्दल गुहागर तालुक्यातून नाट्यप्रेमींकडून समस्त कलाकारांचे अभिनंदन केले जात आहे















