तरुण पिढीनेही जपलेय परंपरा – संस्कृती, वाघबारशी तवसाळ पंचक्रोशीतील बाबरवाडीमध्ये उत्साहात साजरी 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तरुण पिढीनेही जपलेय परंपरा – संस्कृती, वाघबारशी तवसाळ पंचक्रोशीतील बाबरवाडीमध्ये उत्साहात साजरी 

गुहागर : तवसाळ (प्रतिनिधी)

कोकणात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या लोकपरंपरेतील वाघबारस हा सांस्कृतिक सोहळा यंदाही गुहागर तालुक्यातील तवसाळ पंचक्रोशीतील बाबरवाडी येथे उत्साहात पार पडला. कार्तिकी द्वादशी सर्वश्रेष्ठ मानली जाते. याच दिवशी चातुर्मासाची समाप्ती होत असून गुराख्यांच्या देवाची पूजा करण्याची परंपरा आहे. कोकणातील प्रत्येक गावात, वाडी–वस्तीत ही परंपरा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. बाबरवाडीत मात्र हा सोहळा आजही तितक्याच श्रद्धेने जपला जात आहे.

अनेक जुन्या परंपरा लोप पावत असताना, वाघबारशीसारखी लोकपरंपरा जिवंत ठेवण्याचे काम तरुण पिढी करताना दिसून येते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, नवतरुण आणि तरुणी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होतात. जेवणाची तयारी, वाघ पिटळण्यासाठी रंगरंगोटी, मुलांचे जंगली प्राण्यांसारखे साजिरे रुपांतरण, कमरेभोवती झाडांची पानं, भाताचा पेंडा, डहाळ्या लावून सजविणे हे दृश्य नजरेत भरणारे असते.

गुराख्यांच्या देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ‘वाघ पिटळणे’ हा कार्यक्रम पार पडतो. शेवटी नदीत स्नान करून सर्व ग्रामस्थ आनंद लुटतात. या विधीत प्रतीकात्मक रीत्या वाघाला गावाबाहेर हद्दपार केले जाते. ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी देवीसमोर विनवणी करण्यात येते. गुरांचे रक्षण व्हावे, चरायला कोणतीही अडचण येऊ नये, सर्व गुरांना सुख-समाधान लाभावे म्हणून ही शताब्दीप्राचीन पद्धत आजही कायम आहे. सोहळ्यानंतर सर्व गुरे मे महिन्यापर्यंत चरायला सोडली जातात.

या कार्यक्रमाला बाबरवाडीतील प्रतिष्ठित व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात ग्रामस्थ अध्यक्ष संदीपजी जोशी, शंकरजी येद्रे, विजयजी नाचरे, गणपतजी येद्रे, मोहन येद्रे, यशवंत नाचरे, गणू येद्रे, अशोक नाचरे, आनंद येद्रे, दीपक येद्रे, दीपक जोशी, ज्ञानेश रसाळ, सचिन येद्रे, अविनाश नाचरे, सुरेश येद्रे, सुरेश नाचरे तसेच ग्रामस्थ महिला मंडळ यांचा विशेष सहभाग दिसून आला.

अशा पारंपरिक सोहळ्यांमुळे ग्रामीण व कोकणची संस्कृती पुढील पिढीकडे पोहोचण्यास मदत होते. वाघबारशी निमित्ताने परंपरा, लोकश्रद्धा, आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा सुंदर संदेश बाबरवाडीने दिला आहे.

Hashtags 

  • वाघबारशी गुहागर
  • तवसाळ पंचक्रोशी बातमी
  • कोकणची लोकपरंपरा
  • वाघ पिटळणे सोहळा
  • ग्रामदैवत महामाई सोनसाखळी देवी
  • गुहागर सांस्कृतिक कार्यक्रम

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात