अकल्पित — खारवी समाजाच्या एकजुटीचा विजय -श्री गणेश नाट्य मंडळ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अकल्पित — खारवी समाजाच्या एकजुटीचा विजय -श्री गणेश नाट्य मंडळ

खारवी समाजातील सर्व स्तरांवरून मिळालेल्या अकल्पित सहकार्याबद्दल आम्ही सर्वांच्या प्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2025-26 या प्रतिष्ठित रंगमंचावर आमच्या दर्यावर्दी प्रतिष्ठान निर्मित, श्री गणेश नाट्य मंडळ नवानगर-वेलदूर सादरित “अकल्पित” या दोन अंकी नाटकास जे सहकार्य, प्रेम आणि शुभाशीर्वाद लाभले, ते आमच्यासाठी शब्दांपलीकडचे आहे.
या यशामागे केवळ अकल्पित टीम नाही, तर नवानगर ग्रामस्थ, महिलामंडळ आणि आमचे सर्व समाजबंधू-भगिनी यांची अढळ साथ आहे. गावातील तिन्ही वाडीचे पाटील — श्री. दत्ताजी वणकर, श्री. शंकर कोळथरकर, श्री. नारायण रोहिलकर — यांनी नेहमीप्रमाणेच नाट्यकलेसाठी आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिले. लहानपणापासून गावातील नाट्य परंपरेचा संस्कार आम्हाला लाभला, आणि याच वारशातून आजचे आमचे प्रयत्न फुलले आहेत.
श्री. देवरामजी भोसले, श्री. उपेंद्र दाभोळकर, श्री. दशरथ नाटेकर, श्री. जयगणेश नाटेकर या दिग्दर्शकांनी नवानगरची रंगभूमी कायम सजीव ठेवली. नाट्य लेखक म्हणून श्री. राजेंद्र दाभोळकर यांनी ३ अंकी नाटक नाजूक फुल लिहिले व त्याचे अनेक प्रयोग गावागावातून झाले. आजूबाजूच्या गावांतून नाट्यकला विरत असताना, नवानगर गावाने ती जपली आणि पुन्हा इतर गावांत जागवली, हे आमच्यासाठी अभिमानाचे आहे.

श्री. गणेश नाट्य मंडळ व श्री. शनिदेव महिला मंडळ, नवानगर-वणकरवाडी यांचे योगदान शब्दात मांडणे कठीण आहे. कारण जिथे एकवाक्यता, संघभावना आणि एकी असते, तिथे व्यक्तिनामे गौण ठरतात — कारण तीच एकत्रित शक्ती म्हणजे वज्रमूठ!
दर्यावर्दी प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार .दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत या बॅनरखाली आम्हाला संधी देणारे अध्यक्ष श्री. संतोषजी पावरी साहेब, तसेच श्री. दिनेशजी जाक्कर, श्री. भगवानजी पाटील, श्री. निलेशजी पाटील आणि संपूर्ण दर्यावर्दी टीम यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि सहकार्याची शक्ती आम्हाला राज्यस्तरीय रंगमंचावर नेणारी ठरली. विशेषतः श्री. संतोषजी पावरी साहेब यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ते सर्व समर्थन देऊन “नेतृत्व म्हणजे काय” याचे जिवंत उदाहरण घालून दिले.भैरी देवी संस्थान, जांभारी चे अध्यक्ष श्री. सुधीरजी वासावे साहेब यांनी सलग दोन दिवस आमच्यासोबत राहून संपूर्ण व्यवस्थापन निर्दोष ठेवले. खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था, खारवी समाज समिती रत्नागिरी, तसेच सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्गांनी दिलेल्या सहकार्याबद्दल विशेष धन्यवाद. श्री. दामोदर अण्णा लोकरे, श्री. भगवान बुवा लोकरे यांच्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी ठरल्या. समाजबंधुत्वाचा महासंगमखारवी समाज समिती, गुहागर, दर्यावर्दी खारवी समाज समिती, उत्तर रत्नागिरी, गुहागर तालुका खारवी समाज ज्ञाती बांधव गट नं.३, अखिल महाराष्ट्र कष्टकरी महासंघ, तसेच खारवी समाज समिती, मुंबई यांच्या आवाहनानुसार झालेल्या प्रचंड उपस्थितीने नाट्यप्रयोग ऐतिहासिक ठरला. गावडेआंबेर व पूर्णगड गावांतील बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन टीमचे स्वागत केले, ज्याने संपूर्ण कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. मार्गदर्शन आणि प्रेरणा
आमचे मार्गदर्शक व आदर्श — सन्मा. रामजी सारंग साहेब, श्री. वासुदेवजी वाघे, श्री. संतोषजी सारंग, श्री. लक्ष्मणजी सारंग — यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आमचे सादरीकरण अधिक प्रभावी झाले. गुहागर तालुक्यात नाट्यप्रेम जपणारे श्री. अजितजी पाटील, श्री. मंगेश लाकडे, श्री. चंद्रकांत (बंड्या) आंबेरकर यांच्या प्रेरणेनेच आम्ही आज राज्यस्तरावर पोहोचलो.
विशेष उल्लेख करावासा वाटतो — श्री. अनिलजी जाक्कर (भावजी) यांचे — कारण त्यांच्या प्रेरणेनेच आज आमच्या मंडळाकडे उत्कृष्ट महिला कलाकार आहेत. तसेच श्री. योगेशजी खडपे यांनी तयार केलेले आकर्षक बॅनर रसिकांना खेचून घेणारे ठरले. त्यासोबत वार्तापत्र व मिडिया च्या माध्यमातून जनजागृती केली ते आमचे नवानगर मराठी शाळेचे प्रा. मनोजजी पाटील सर यांचेही आभारी आहोत.
आत्मीय सहकार्.नाटक म्हटले की रिअलसल, जागरण, चहापान — हे सगळं आनंदाने निभावून नेणारे श्री. नामदेव वणकर यांचे योगदान अनमोल आहे; त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.
दर्यावर्दी प्रतिष्ठानचे सदस्य व आमचे परममित्र श्री. विठोबा जाधव, सौ. प्राजक्ता जाधव व परिवार यांनी निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था केली. सौ. अमृता सुर्वे (धोपावे) यांनी स्वतःचा फ्लॅट टीमच्या वापरासाठी दिला — ही आत्मीयता आम्ही कधीही विसरणार नाही. खारवी समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने परिश्रम घेतले — सर्वांची नावे घेणे शक्य नाही, पण प्रत्येकाचा वाटा आम्हाला अमूल्य आहे.
अशा असंख्य व्यक्ती, संस्था आणि समाजबांधवांच्या निःस्वार्थ पाठबळामुळेच “अकल्पित” आज समाजासमोर ठामपणे उभे आहे. आपल्या सर्वांच्या प्रेम, शुभेच्छा आणि विश्वासामुळेच आम्ही ही वाट आत्मविश्वासाने चालत आहोत.
पुनश्च मनःपूर्वक धन्यवाद! — श्री. गणेश नाट्य मंडळ, नवानगर व संपूर्ण “अकल्पित” टीम

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला! बुकिंग होऊनही सिलिंडर मिळेना, पण 'ओटीपी' आला! ५२ सिलिंडरचा परस्पर काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा...
Read More
गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

:गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची 'नवोदय'साठी निवड ग्रामीण भागातून यशाची उंच भरारी; ९३.७५% गुण मिळवून पटकावला...
Read More
गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

*जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त* राजापूर दि.२३ (प्रशांत पवार ) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे...
Read More
जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...