जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जवळ; पडवे गटात उमेदवारांची लगबग

breaking

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जवळ; पडवे गटात उमेदवारांची लगबग

📰 गुहागर तालुक्यात निवडणुकीचे वारे वेगाने — पडवे-वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात उमेदवारांच्या हालचालींना वेग

🔸 जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची लगबग; उमेदवारीवरून चर्चांना उधाण

गुहागर -तालुका प्रतिनिधी : सुजीत सुर्वे -पडवे 

रत्नागिरी जिलयातील गुहागर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर आता पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तालुक्यातील विविध गटांत हालचालींना वेग आला असून, अनेक इच्छुकांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी विनंती केल्याचे समजते. काही ठिकाणी बंडखोरीच्या हालचालीदेखील दिसू लागल्या आहेत.

🏛️ पडवे व वेळणेश्वर गटात उमेदवारीची चुरस

तालुक्यातील पडवे आणि वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात इच्छुकांची संख्या मोठी असून, “उमेदवारी मला मिळणारच” या विश्वासाने अनेक कार्यकर्ते पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधत आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी या दोन्ही गटांत विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला होता.

वेळणेश्वर गटात दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत; मात्र पडवे गटात सस्पेन्स कायम आहे. दोन्ही पक्षात इच्छुकांची गर्दी आहे. दोन्ही ही गट विद्यमान आमदार भास्करशेठ जाधव यांनी प्रतिष्ठ्येचे केले आहेत. या दोन्ही गटात ची बंडखोरी झाली ती इथल्या अनेक निष्ठावान कार्यकरतींना पंचलेली नाहीय, निष्ठावंत शिकसैनिक यांचे मध्ये मोठा रोष आहे.

पडवे जिल्हा परिषद गटातील संभाव्य उमेदवार

विद्यमान सदस्य महेश नाटेकर हे शिवसेना (शिंदे गट) तर्फे पुन्हा उमेदवारी मिळेल या भरोशावर आहेत. त्यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू ठेवले असून, तुकाराम निवाते हे देखील त्याच गटातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून सचिन बाईत आणि रविंद्र आंबेकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

पडवे पंचायत समिती गणातही इच्छुक….

वसंत किल्लेकर, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, आनंद भोजने, मिलिंद चाचे, विजय मोहिते आणि सागर काजरोळकर, संतोष बारस्कर या नी पडवे पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी तयारी दर्शवली आहे.
विशेष म्हणजे, आनंद भोजने यांनी “पक्षाने विचार केला नाही तर अपक्ष म्हणून मैदानात उतरेन” असा इशारा देत अपक्ष मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महा युती की महा विकास आघाडी?

अद्याप महा युती की महाविकास आघाडी याबाबत औपचारिक घोषणा झालेली नाही. ग्रामीण भागात कार्यकर्त्यांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दिसत असून, प्रत्येक पक्षाचा स्थानिक नेतृत्व गट आपला पक्ष अस्तित्व सिद्ध करण्याच्या मोहीमेत व्यस्त आहे.

🏁 पडवे हा शिवसेनेचा बालेकिल्ला?

इतिहासात पडवे जिल्हा परिषद गट हा शिवसेना (UBT) गटाचा मजबूत बालेकिल्ला राहिला आहे. या मतदार संघा मध्ये कुणबी ,खारवी,मुस्लिम मतदार यांचा मोठा प्रभाव आहे मात्र आता “हा गड पुन्हा उद्धव गटाकडे राहील का? की शिंदे गट हा गड ताब्यात घेईल?” याबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि निष्ठावान मतदारांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.

सध्या सर्वच तालुक्यातील राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मतदार संघ नीहाय दौरे सुरू केले आहेत. काही ठिकाणी बंडखोरी करणाऱ्यानाही समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दोन्हीकडून फायनल उमेदवारी ची अजून प्रतिकक्षा च आहे. येत्या काही दिवसात आपल्यालाच उमेदवारी मिळेल याच आशेवर उमेदवार,समर्थक कार्यकर्ते आहेत .


 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी
Play sound