पाचेरीसडा ग्रामपंचायतीत ‘आदिशक्ती अभियान’ राबवण्यासाठी समिती स्थापन

 

पाचेरीसडा ग्रामपंचायतीत ‘आदिशक्ती अभियान’ राबवण्यासाठी समिती स्थापन

 

.गुहागर,~पाचेरी सडा (सुजित सुर्वे)

निर्मळ ग्रामपंचायत पाचेरीसडा येथे शासनाच्या सूचनेनुसार “आदिशक्ती अभियान” प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायतीत विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. दिनांक 28 जुलै 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठरावानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

 

ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्तरावर प्रतिनिधींच्या सहभागाने समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी वर्षा विठ्ठल डिंगणकर यांची निवड करण्यात आली असून, धर्मानंद गोविंद यादव, शशिकांत गोविंद यादव, साक्षी संतोष यादव, कीर्ती जानर्डन इरूळकर, विश्वनाथ प्रतापसिंग पवार, शंकर लक्ष्मण डिंगणकर, तसेच संध्या संतोष आंग्रे या सदस्यांचा समावेश आहे.

 

समितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत अधिकारी, पोलिस पाटील, आशा व अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक शिक्षक यांचा सहभाग असल्यामुळे अभियान राबविताना विविध स्तरांवर समन्वय साधला जाणार आहे.

 

ग्रामपंचायत अधिकारी विश्वनाथ प्रतापसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “आदिशक्ती अभियान” अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच ग्रामस्वच्छता, आरोग्य आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

 

या ठरावाची नोंद सूचक प्रदीप रामचंद्र जोशी आणि अनु धर्मानंद गोविंद यादव यांनी केली असून, ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें