आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये बाल दिन साजरा

आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये बाल दिन साजरा

पंडित नेहरू यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

गुहागर ~

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेमध्ये बालदिन कार्यक्रम अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला .इयत्ता चौथीतील गुणवंत विद्यार्थी कुमार प्रशुद्ध पटेकर याच्या शुभहस्ते चाचा नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .त्यावेळी डॉ मनोज पाटील, पदवीधर शिक्षक निलेश पाटील, शिक्षक धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला ,विद्यार्थिनी प्रतिनिधी आरोही रोहीलकर ,अनिश पालशेतकर ,सांस्कृतिक प्रतिनिधी अन्वी जांभारकर, सानवी रोहीलकर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते .त्यावेळी मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील यांनी मुलांचे आवडते चाचा नेहरू यांच्या जीवनातील प्रेरणादायी आठवणी सांगितल्या .चाचा नेहरू यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा ,विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करावे असे त्यांनी आवाहन केले.त्यावेळी बालमित्रांचे पुष्पगुच्छ व खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें