तळवली हायस्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा…
नवीमुंबई (मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता.गुहागर जि.रत्नागिरी या प्रशालेमध्ये दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन ‘बाल दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एम. ए.थरकार सर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार आपण करण्यात आला.तसेच इतर शिक्षक वृंद यांनी पुष्प वाहुन त्यांना अभिवादन केले,त्यानंतर इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. दिया पवार हिने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी विचार व्यक्त केले तसेच बाल दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.त्यानंतर प्रशालेचे जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री.बागल सर यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेतला,यावेळी बोलताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.त्या वेळी देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला त्यांना लहान मुले खूप आवडत होती आणि मुलांनाही ते खूप आवडायचे मुल त्यांना चाचा नेहरू असे संबोधित होते असे सांगून बाल दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एम. ए.थरकार सर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बाल दिनाच्या निमित्ताने सर्व बालकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या,या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.कुळे सर यांनी केले होते, या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.श्री.कुळे सर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शेवटी आभार व्यक्त करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.















