वरवेली येथील अंगणवाडी मराठवाडी येथे विविध उपक्रमांनी बालदिन उत्साहात साजरा

वरवेली येथील अंगणवाडी मराठवाडी येथे विविध उपक्रमांनी बालदिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील वरवेली येथील अंगणवाडी मराठवाडी येथे विविध उपक्रमांनी बालदिन उत्साहात साजरा. बालदिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका सीमा किर्वे यांनी विद्यार्थ्यांना बाल दिनाचे महत्त्व सांगणारी प्रेरणादायी माहिती सांगितली. बाल दिनानिमित्त वेगवेगळे पौष्टिक व चविष्ट खाद्यपदार्थांचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. यावेळी खाऊचे वाटप देखील विद्यार्थ्यांना करण्यात आले. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान केली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून बालगीतांचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी बालगीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.या कार्यक्रमासाठी अंगणवाडी पालक समिती अध्यक्ष मनस्वी किर्वे, अंगणवाडी सेविका सीमा किर्वे, अंगणवाडी मदतनीस अस्मिता पवार व सर्व पालकांनी विशेष मेहनत घेतली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें